Top Post Ad

महिलेचा विनयभंग, पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सासूच्या नातेवाईकाने केला सुनेचा विनयभंग

पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


 

शहापूर 
रविवारी दिनांक  १८ ऑक्टोबर  रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास विवाहित घरी असतांना तिचे घरात राहणारा विवाहितेच्या सासूचा  नातलग मंगेश जोशी हा घरात अंघोळ करताना अंघोळ झाल्यावर महिलेस टॉवेल घेऊन ये असे बोलले असता ती टॉवेल घेऊन गेली असता मंगेश जोशी याने तिचा हात पकडून तिला बाथरूम मध्ये त्याचे जवळ ओढून तिच्याशी जवळीक साधण्याचा व तिचे मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून मंगेश जोशी याचेवर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा केल्याची माहिती पडघा पोलीसांकडून प्राप्त झाली आहे. 

 

भिवंडी तालुक्यातील पडघा बसस्टँड जवळ महाराष्ट्र बँकेसमोर राहणाऱ्या २० वर्षीय महिलेचा तिच्या पतीच्या व तिच्या कुटुंबाने ठरविल्याप्रमाणे ३ जून २०२० रोजी म्हणजे चार महिन्यांपूर्वी भिवंडी येथे कोर्ट मॅरेज करून ती महिला पडघा येथे राहण्यास आली त्यावेळी या महिलेचा पती व तिची सासू असे राहत होते. त्याच वेळेस पीडित महिलेच्या सासूच्या संबंधातील मंगेश जोशी हे सुद्धा आमचे घरात राहतात हे महिलेस समझले त्यानंतर तिची सासू व तिचा नवरा यांच्यात वारंवार घरात शाब्दिक वाद होत होते. त्यामुळे पीडित महिला  तिच्या नावऱ्यास सांगून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिच्या  माहेरी पिंपळपाडा, तालुका शहापूर येथे राहण्यास गेली होती.

 

दरम्यान रविवारी दिनांक  १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ती व तिचे आई वडिलांच्या सल्ल्याने पडघा येथे तिचे पतीच्या घरी पडघा येथे नांदण्यासाठी  परत आले. त्यावेळी पिडीतीचे पती घरी नव्हते तिचे घरात तिची सासू व मंगेश जोशी हेच होते. पिडीतीचे आईवडील तिला घरी सोडून ते परत शहापूर येथे जाण्यास निघाले त्यानंतर पीडित महिला घरात घरकाम करत होती. तिची सासू दरवाज्यात बसली होती व मंगेश जोशी हे घरातील बाथरुममध्ये अंघोळीस गेले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास तिच्या घरातील मंगेश जोशी यांनी बाथरूममध्ये अंघोळ करतांना तिच्याकडे मला टॉवेल दे माझी अंघोळ झाली आहे. असे बोलल्याने सासू बाहेर बसली असल्याने ती पीडिता टॉवेल घेऊन गेली असता मंगेश जोशी याने तिच्या हाताला धरून बाथरूममध्ये आत ओढून तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तसा ती त्याचा हात झटकून बाहेर आली त्यावेळी तिची सासू पण तेथे आली तीने या विवाहितेच्या दोन्ही हातांना पकडून तिला शिवीगाळ व मारहाण केली त्यावेळी झटापटीत त्यावेळी माझ्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून खाली पडले,

 

मंगेश जोशी हा सासू घरी नसतांना तिच्या अंगाला स्पर्श करतो व तिच्यासोबत अश्लील चाळे करतो. हा घडलेला सर्व प्रकार पिडीतीने फोन करून तिच्या आईवडिलांना सांगितला त्यानंतर पीडित महिला व  तिचे आईवडील यांनी पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पडघा पोलीस ठाण्यात मंगेश जोशीवर भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५४, ३५४ ए नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार प्रकाश चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com