Trending

6/recent/ticker-posts

सफाई कामगारांना मागील आठ वर्षांपासून गणवेशच नाही

पालघर नगर परिषदेमधील आरोग्य विभागातील सफाई कामगारांना मागील आठ वर्षांपासून गणवेशच नाही


पालघर
महाराष्ट्र राज्य एकता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि दक्ष जनरल कामगार युनियनचे सभासद असलेले,  पालघर नगर परिषदेमधील अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभागातील सफाई कामगारांना सन २०१८ - २०१९ व २०१९ - २०२० पर्यंत अनुदान मिळणे. वसाहतगृह मिळणे, पाचवे, सहावे व सातवे वेतन आयोग मिळणे, मागील आठ वर्षांपासून गणवेश न मिळाल्यामुळे या वर्षी नवीन मिळणे इत्यादी मागण्यांकरिता युनियनचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस  डॉ. विशाल अरुने  यांनी पालघर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले


तसेच साबण, मास व ग्लोव्हस, बूट मिळणे , भविष्य निर्वाह निधीची पावती मिळणे, त्याचा हिशोब मिळणे, कर्मचाऱ्यांना सोसायटी फंड मिळणे, अनुकंपा तत्वावर कर्मचारी मयत असलेल्या कामगारांना कामावर घेणे, आपल्या अस्थापनेत कर्मचारी मनुष्य बळ वाढिवणे, कर्मचान्यांना ज्येष्ठतेनुसार पदोनियुक्ती मिळणे, कोविड (Covid - १९) च्या महामारी मध्ये कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईम (O.T) भत्ता मिळणे, कोविड (Covid - १९) महामारी मध्ये सफाई कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा कव्हर मिळणे, इत्यादी मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 


कर्मचाऱ्यांच्या विविध हक्काच्या मागणीसाठी संबंधित प्रशासकांकडून वेळोवेळी पाठपुरावा करून पत्र व्यवहार केला आहे. परंतु आजपर्यंत मागण्या मंजूर होण्याबाबत पालघर नगर परिषदेने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे विविध मागण्यांपासून  कर्मचारी वंचित राहिले आहेत तरी याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे अरुणे यांनी निवेदनात म्हटले आहे. 


Post a Comment

0 Comments