सत्कार समारंभ
गेल्या बऱ्याच महिन्या पासून कोरोना महामरीच्या पार्श्वभूमीवर आपल्या टिटवाळा नगरीतील आरोग्य कर्मचारी यांनी जी काही कार्य केली आहेत ती खरंच कौतुकास्पद आहेत या कामात डॉ तृणाली महातेकर,रविराज गायकवाड, सौ मिरा हणमंते, सौ मिरा काळे ,सौ माया गडसे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची दखल म्हणून ,मंगळवार दि.१३/१०/२०२० रोजी प्रभाग क्र.९ च्या नगरसेविका/मा.उपमहापौर सौ.उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी टिटवाळ्यातील संपूर्ण आरोग्य खात्याचं सत्कार समारंभ आयोजित करून त्याच्य हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले।
आज टिटवाळ्यातील कोरोना बधितांची संख्या कमी होत चालली आहे।
गेल्या २दिवसात ठाणे ग्रामीण मांडा- टिटवाळा पोलिस स्टेटेशन मधील सर्व पोलिस बांधवाची देखील चाचणी करण्यात आली यात आनंदाची बातमी म्हणजे एकही पोलिस कर्मचारी कोरोना बाधित आढळले नाही. ही कौतुकास्पद बाब आहे।
आरोग्य कर्मचाऱ्यांचा कर्तव्यदक्ष पणा व त्यांची मेहनत पाहता संपूर्ण टिटवाळा लवकरच कोरोना मुक्ता होईल असा विश्वास सौ.उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी व्यक्त केला.
तरी आजच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याचसोबत वेळोवेळी आरोग्य खात्याचा जनहित उपक्रम लेखणी स्वरूपात जनतेसमोर सादर करुन जागृत करण्याचे काम प्रजासत्ताक जनतेने केले आहे।आणि यापुढेही ते कायँरत राहणार असे मत आरोग्य खात्याने व्यक्त केले।
सदरील उपक्रम
ठिकाण:- आरोग्य केंद्र,गावदेवी मंदिर जवळ मांडा-टिटवाळा (प)
येथे सकाळी ११:०० वा.आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात डॉ तृणाली महातेकर, रविराज गायकवाड,अग्णीहोत्री आदि प्रमुख सहकारी,पत्रकार मनोजकुमार जगताप ईत्यादींनी सहकार्य तथा मनोगत व्यक्त केले।।।
0 टिप्पण्या