Top Post Ad

*उतरंड* - खैरलांजीचं वास्तव मांडणारा सर्वोत्तम चित्रपट

 *उतरंड*  - खैरलांजीचं वास्तव मांडणारा सर्वोत्तम चित्रपटमुंबई
प्रत्येक 18 मिनिटाला या देशात जातीय द्वेषातून एका स्त्रीवर बलात्कार होतो आणि 45 मिनिटाला एक हत्या, गेल्या वर्षात सरकारी आकडेवारीनुसार 35000 बलात्कारांची नोंद झाली आणि 23 हजार हत्या झाल्या.. परंतु ज्या अत्याचारांची नोंदच झाली नाही किंवा पोलिसांनी दखलच घेतली नाही अशा घटना किती पटीने अधिक असतील. दलितांवरील अत्याचार हे आता नित्याचीच बाब झाली आहे. काही काळ त्यावर चर्चा, आंदोलने होतात. आणि नंतर सारं काही जैसे थे. मात्र चित्रपटाच्या माध्यमातून या घटना कायम राहतील या उद्देशाने वाघमारे यांनी उतरंड चित्रपटाची निर्मिती केली आहे.  *उतरंड* 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून. आज पर्यंत साडेचार लाख लोकांपर्यंत तो अनेक मार्गानी पोहोचला ही खूप मोठी गोष्ट आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुदाम वाघमारेंनी केले असून निर्मिती भूषण बोराडे यांची आहे. एकच सिनेमा पुरुन उरेल अशी ही धडाडी आहे. मोठी गरुडझेप आहे असे म्हणावे लागेल. हा चित्रपट खैरलांजी पासून ते हाथरस पर्यंत आणि आता काल परवा घडलेल्या महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या गैंग रेपचं महाभयंकर चित्र मांडतो आणि या घनघोर अत्याचाराविरोधात आवाज देखील उठवतो.नागपूरपासून 37 किलोमीटर अंतरावरील खैरलांजी गावात 14 वर्षांआधी 29 सप्टेंबर 2006 रोजी दलित कुटुंबातील चार जणांची दलितेतर समुहाकडून अमानुषपणे हत्या करण्यात आली होती.    महाराष्ट्रातल्या भंडारा  जिल्ह्यातील  मोहाडी तालुक्यातल्या खैरलांजी गावात घडले. या दिवशी गावातल्या एका कुटुंबातल्या चार जणांची सायंकाळच्या सुमारास गावातल्याच काही लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल सप्टेंबर १५ २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले. पण चौदा वर्षानंतर या घटनेतील पीडित कुटुंबीयांपैकी कुणीही आज न्याय मिळविण्यासाठी हयात नाहीत. या हत्याकांडांतून बचावलेले भैयालाल भोतमांगे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी संघर्ष केला. पण 20 जानेवारी 2017 रोजी हृदयधक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. सध्या खैरलांजी गावात भयाण शांतता आहे. अशा या घटनेचे वास्तव काळाच्या ओघात वाहून जाऊ नये आणि येणाऱ्या पिढीला याची भीषण दाहकता कळावी म्हणून सुदाम रघुनाथ वाघमारे यांनी चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा या घटनेला उजाळा दिला आहे.


१९५६च्या विजयादशमी दिनी जगातली क्रांतीकारी घटना घडली. ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली बौद्ध धम्माची दिक्षा!  त्याआधीच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आमच्यासाठी मोकळा करून दिलेला सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग आम्हाला झपाट्याने बदलून गेला. आज आमच्यातला 20 टक्का वर्ग इथल्या प्रस्थापितांशी बरोबरी करू लागला. सर्व पदे भूषवू लागला. सगळी क्षेत्र काबीज करू लागला. परंतु चित्रपट क्षेत्रात हवी तशी फळी आंबेडकरी समाज निर्माण करू शकला नाही. या मागे अनेक कारणे आहेत. त्यामध्ये जातीयवाद. हे एक प्रमख कारण आहेच. काही महिन्यापूर्वीच एका कलाकाराने " मालिकांमधून सर्व अभिनेत्री ब्राह्मणच का" असे विधान करून याची दाहकता दाखवून दिली होती.  या क्षेत्रात येण्यासाठी लागणारे महागडे शिक्षण, योग्य मार्गदर्शन, आर्थिक गणित, कौटुंबिक प्रोत्साहनाची उणीव , या क्षेत्रातली अनिश्चितता, आणि वर काही नैतिकतेच्या बऱ्या वाईट अफवा यामुळे आंबेडकरी समाज या क्षेत्रात मागेच राहिला. पण या सर्व गोष्टींवर मात करून सुदाम रघुनाथ वाघमारे यांनी या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाच. आज भारत हा जातीभ्रष्ट देश बनला आहे. गेल्या 6 वर्षा पासून तर अधिकच. या देशातील विषमतावादी संस्कृती आणि एका विशिष्ट समाजाला आणि स्त्रीला दिलेला इथल्या धर्माने दिलेला गुलामीचा दर्जा यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो मेंदू चेतवतो, आणि आवाज उठविण्यास प्रवृत्त करतो... असा हा चित्रपट धम्मक्रांती दिनी बुद्ध विहारात प्रदर्शित होणे ही एक क्रांतिकारीच घटना आहे. वाशिंद येथे धम्मराजिक विपश्यना सेंटर येथे जागतिक भिक्कू संघाच्या उपस्थितीत आणि अनेक सामाजिक संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्याच्या साक्षीने बुद्धविहारातच प्रीमियर शो पार पडला. बाबासाहेब म्हणत की बुध्दविहार ही देशाची क्रांती केंद्र बनली पाहिजेत. तेव्हा इतिहासाने नोंद ठेवावी अशी ही घटना आहे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनी आणि भिक्कू संघाच्या 11 भदंतांनी सुदाम वाघमारे आणि निर्माते भूषण बोराडे यांचा सत्कार केला. बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्याला माल्यार्पण करून सुरुवात झाली एक पायी फेरी काढली. आणि मग विहारात भिक्खू संघाला उतरंड टीमच्या वतीने चिवर प्रदान करण्यात आले. अशा प्रकारे चित्रपटाचा प्रकाशन सोहळा होणे ही जगातली पहिलीच घटना आहे.  कारण प्रीमियर म्हटले की नाच गाणे अन दारूच्या मटणाच्या पाया,असा वर्षानुवर्षांचा रीती रिवाजच या सिनेमाने मोडून काढला ही खूप मोठी क्रांतिकारी घटना असल्याचे अनेक उपस्थित पत्रकारांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटले.


या चित्रपटात नाशिक पुणे औरंगाबाद नागपूर येथिल शेकडो कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे सुदाम वाघमारेंनी भैय्यालाल ची अत्यंत कठीण भूमिका साकारली आहे. हा चित्रपट फक्त आठ दिवस दिसणार असून चित्रपट. ज्यांना हा चित्रपट बघावयाचा असल्यास त्यांनी aim2 चे सभासद बनने आवश्यक आहे. असे निर्माते भूषण बोराडे यांनी सांगितल. थायलंड अमेरिका जपान इंग्लंड या देशातील लोक देखील चित्रपटाची मागणी करताहेत हे विशेष. लाखो रुपयांचे ऍडव्हान्स बुकिंग झालेले आहे. आणि प्रत्येक तासाला नवीन लोक समाविष्ट होतं आहेत. 


अधिक माहितीसाठी 9820208028 अथवा 9833777250 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कीर्ती संध्या (पी आर ओ) यांनी आवाहन केले आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com