हे घर मुस्लिम आणि पाळीव प्राण्यांना भाड्याने दिले जाणार नाही

 हे घर मुस्लिम आणि पाळीव प्राण्यांना भाड्याने दिले जाणार नाही मुंबई
मुंबईतील खार भागात तीन बीएचके फ्लॅट भाड्याने देण्याची जाहिरात वादाच्या भोवनऱ्यात सापडली आहे. फेसबुकवर पोस्ट केलेल्या या जाहिरातीमध्ये हे घर मुस्लिम आणि पाळीव प्राण्यांना भाड्याने दिले जाणार नाही असे म्हटले आहे.  उन्मेष पाटील यांनी या फ्लॅटची जाहीरात दिली आहे. सोशल मीडियावरील मोठ्या संख्येने लोकांनी जाहिरात देणाऱ्यावर टीका केली आहे. पण काहींनी ती खासगी मालमत्ता असे आणि कोणाला फ्लॅट भाड्याने द्यायचा हा त्याचा हक्क असल्याचे सांगून त्याचा बचाव केला.


पत्रकार राणा अयूब यांनी ही जाहिरात ट्वीट करून लिहिले आहे की, तो पत्ता मुंबई आणि वांद्रे येथील पॉश भागातील आहे. हा 20 व्या शतकातील भारत आहे. मला आठवण करून द्या की आम्ही जातीय देश नाही? मला सांगा की तो रंगभेद नाही? आपला वैयक्तिक अनुभव सांगताना राणा अयूब यांनी लिहिले की, त्यांनाही वांद्रे येथे भाड्याचे घर घेण्यास अडचण होती. त्यांच्या नावावरून त्यांचा धर्म ओळखला जात नाही, परंतु जेव्हा घरमालक त्यांचे आडनाव ऐकायचे तेव्हा वेगवेगळी कारणे देऊन त्यांना टाळत होते.राणाच्या या ट्विटवर री-ट्वीट करत पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी या जाहीरातीला भाजपा आणि RSS च्या विचारधारेशी जोडले. ते म्हणाले की, 21 व्या शतकातील हा अधिकृतपणे स्वीकारलेला भेदभाव आहे. केवळ भाजपा आणि आरएसएससारख्या कट्टर विचारसरणीस यास परवानगी देऊ शकते. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA