Top Post Ad

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मंत्रालयाशेजारच्या गांधी पुतळ्यासमाेर आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मंत्रालयाशेजारच्या गांधी पुतळ्यासमाेर आंदोलनमुंबई
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की व अटक केल्याचे पडसाद शुक्रवारी राज्यात उमटले. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मंत्रालयाशेजारच्या गांधी पुतळ्यासमाेर आंदोलन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आ. झिशान सिद्दिकी, माजी मंत्री अनिस अहमद, बाबा सिद्दिकी, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.


यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार व योगी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, उत्तर प्रदेशात जंगलराज आहे हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. हाथरस येथील अमानवी घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार करत आहे. त्यामुळेच राहुल आणि प्रियंका गांधी यांना हाथरस येथे जाऊ दिले गेले नाही. यावेळी मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री योगी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रीय नेत्यांबरोबर उत्तर प्रदेश पोलिसांची वर्तणूक अत्यंत चुकीची असल्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख म्हणाले. उत्तर प्रदेशचे पाेलिस राजकीय हेतूने प्रभावित झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com