उत्कृष्ट संगीताची आवड असणाऱ्यांसरिता फिट प्रो पॉवर नवे डिव्हाईस

ट्रुकने फिट बड्स आणि फिट प्रो पॉवर केले लॉन्च


मुंबई
 ऑडिओ ब्रँड ट्रुकने संगीताची प्रचंड आवड असलेल्या आणि उत्कृष्ट संगीत अनुभवाच्या शोधात असलेल्यांसाठी आरामदायीपणानुसार डिझाइन केलेले फिट प्रो पॉवर आणि फिट बड्स हे नवे दोन डिव्हाइस लाँच केले आहेत. फिट प्रो पॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो म्हणजे १५ मिनिटांच्या चार्जिंगवर ३ तासांचे प्लेब्लॅक होते तर २५ मिनिटांत पूर्णपणे चार्जिंग करता येते. २०० एमएएच चार्जिंग केस इअरबड्स अनेकदा चार्ज करता येते. ट्रुक फिट बड्समध्ये ५०० एमएएच चार्जिंग केस आहे.दुस-या पिढीतील डॉल्फिन डिझाइनचे हे ओपन फिट डीप बास आजपासून अॅमेझॉनवर उपलब्ध असतील.


मोहकरित्या तयार केलेले इअरबड्स रॉयल ब्लू आणि कार्बन ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध आहेत. फिट प्रो पॉवर आणि फिट या दोन्ही इअरबड्समध्ये अत्याधुनिक ब्लूटूथ ५.० आहे. याद्वारे अतिरिक्त रेंज, तत्काळ कनेक्टिव्हिटी आणि ९९ टक्के उपकरणांशी इन्स्टांट पेअरिंगची सुविधा मिळते. स्नग फिट इअरबड्स हे त्वचेसाठी अनुकूल असून ते स्टायलिश कव्हरसोबत येतात. त्यामुळे बाहेर गेल्यावर डोक्याची कोणत्याही प्रकारची हालचाल झाली तरी ते पडत नाहीत. ट्रुक फिट प्रो संगीत प्रेमींसाठी १३मिमी डायनॅमिक ड्रायव्हरस हाय फिडेलिटी साउंड प्रदान करते. हे उपकरण १२९९ रुपये किंमतीत येईल. यात युनिव्हर्सल टाइप-सी चार्जिंग इंटरफेस असून त्यात रिच डिजिटल एलईडी डिस्प्लेदेखील आहे.


ट्रुक फिट बड्समध्ये सिंगल चार्जवर ३.५ तास प्लेबॅक आणि ३ तास कॉल ड्युरेशन मिळते. यात १० मिमी डायनॅमिक ड्रायव्हरसह हाय फिडेलिटी साउंडची सुविधा आहे. यातील इन्स्टांट पेअरिंग टेक्नोलॉजीत ब्लूटूथ ५.० ची सुविधा असून याद्वारे ९९ टक्के स्मार्टफोन्स आणि गेमिंग उपकरणांशी इअरबड्स कनेक्ट करण्याची सोय होते. इअरबड्स १० मिमी डायनॅमिक ड्रायव्हरसह हाय फिडेलिटी साउंडची खात्री दिली जाते. ट्रुक फिट बड्स ७९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad