तरीही  मुंबई महापालिकेचा खासगी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकांसाठीचा प्रस्ताव मंजूर

तरीही  मुंबई महापालिकेचा खासगी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकांसाठीचा प्रस्ताव मंजूरमुंबई 
मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी, कार्यालयांसाठी तीन वर्षांकरिता खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. एकूण तीन हजार खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याबाबतचे २२२ कोटींचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने दिले जात असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला होता. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. असे असतानाही सुरक्षा रक्षकांच्या भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. खासगी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकांसाठी कंत्राट देण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप असल्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्याची तयारी प्रशासनाने केली होती. प्रत्यक्षात तसे न होता हा प्रस्ताव मंजूर झाला.


पालिकेत खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याकरिता पालिकेने ऑगस्ट २०१९ मध्ये २२१ कोटींच्या निविदा मागवल्या होत्या. पालिकेत सध्या असलेल्या ‘ईगल सिक्युरिटी अ‍ॅण्ड सर्व्हिसेस’ या कंपनीने निविदा भरल्या होत्या. तसेच सीआयएस ब्युरो फॅसिलिटी सर्व्हिसेस या कंपनीनेही निविदा भरल्या आहेत. मात्र पालिका प्रशासनाने सीआयएस ब्युरोला कोणतेही कारण न देता अपात्र ठरवून ईगलला हे कंत्राट देण्याची शिफारस केली होती. त्यामुळे भाजपने याविरोधात आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेण्याकरिता निवेदन तयार केले होते. हे निवेदन स्थायी समितीमध्ये येणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात निवेदन न होताच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA