Trending

6/recent/ticker-posts

स्वच्छता पंधरवडा निमित्त ठाणे शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेची जोरदार मोहीम

दुसऱ्या दिवशीही साफसफाई कामांची महापालिका आयुक्त डॅा.विपिन शर्मा यांनी केली पाहणी
ठाणे महापालिकेची स्वच्छता मोहीम जोरात सुरु; आयुक्तांनी केले समाधान व्यक्तठाणे:
स्वच्छता पंधरवडा निमित्त ठाणे शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी महापालिकेची स्वच्छता मोहीम जोरात  सुरु असून संपूर्ण यंत्रणा स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरली आहे. दरम्यान आज दुस-या दिवशीही महापालिका आयुक्त डॅा.विपिन शर्मा यांनी सायंकाळी कोर्ट नाका, सुभाष पथ, स्टेशन रोड तसेच इतर ठिकाणांच्या साफसफाई कामाची पाहणी करून साफसफाई कामाबद्दल समाधान व्यक्त केले.       गेले काही दिवस ठाणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली असून शहर स्वच्छ करण्याची मोहीम जोरात सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीस्तरावरील अधिकाऱ्यामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम सुरु आहे.
 
      कोर्ट नाका, सुभाष पथ, शिवाजी पथ, मासुंदा तलावपाळी, स्टेशन रोड परिसर, सॅटिस परिसर आदी ठिकाणांच्या साफसफाई कामाची महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांनी पाहणी  करून साफसफाई कामाबद्दल समाधान व्यक्त केले.  दरम्यान यापुढे देखील साफसफाईचे काम अशाच पद्धतीने सुरु ठेवण्याच्या सूचना आयुक्त डॉ.शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 2 ऑक्टोबर  2020 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.  सर्व प्रभाग समितीमध्ये रस्त्यावर साचलेला कचरा, रस्ते, गटर साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करण्यात येत आहे. या संपूर्ण कामाची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा रोज पाहणी करत आहेत.     यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments