चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाचा मंत्र्यांनी घेतला आढावा

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाचा मंत्र्यांनी घेतला आढावा


 


मुंबई
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हायब्रीट अँन्यूटी अंतर्गत १६०० कोटीची कामे विविध कंत्राटदाराकडून सुरू आहेत. सर्व कामे कंत्राटदाराने घेताना शासन बांधकाम विभाग नियमानुसार ६० टक्के आणि कंत्राटदार ४० टक्के असा नियम वापरून संबंधित कंत्राटदार यांना परवानगी देण्यात आलेली होती.तरी,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकाही कंत्राटदाराने  ४० % निधीची उभारणी  बँकेकडून कर्ज दाखवून केलेली नसून कंत्राटदाराने देखील स्वताकडून निधीची उभारणी करून कामे पूर्ण केलेली नाहीत.तरी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अपूर्ण रस्त्यांच्या कामासंबंधितची बाब आपत्ती व मदत पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून ही कामे तातडीने पूर्ण करण्यासंबंधीतचे निर्देश दिले.


चंद्रपूर  व गडचिरोली जिल्ह्यात हॅब्रिट ॲम्युनिटी अंतर्गत  रस्त्यांच्या कामासंदर्भात  आढावा बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली त्यावेळी श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्य अभियंता श्री. दशपुते, चंद्रपूरचे मुख्य अभियंता सुष्मा साखरवाडे, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


 चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील  रस्त्यांची कामे संथगतीने सुरु असून  रस्त्यांची दुरवस्था आहे.कंत्राटदार ४०% निधीचा खर्च करत नसून ही कामे  शासनाच्या ६० %  निधीतूनच होत असल्याने कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.त्यामुळे ही कामे दर्जेदार व जलदगतीने व्हावीत, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी केली.  सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी श्री. वडेट्टीवार यांच्या मागणीची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना या कामावर लक्ष ठेवून रस्त्यांची कामे जलदगतीने करण्याचे निर्देश दिले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA