आज मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाले आहे.
जालना
शिवाजी महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापन केली होती. त्यामुळे मराठा समाजाप्रमाणे ओबीसी, दलित समाज ही माझा आहे. देशात पहिले आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिले होते. त्यात मराठा समाजाला ही आरक्षण होते. १९६७ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण होते. मात्र, मराठा, माळी, तेली समाजाला ओबीसींमधून काढण्यात आले. त्यानंतर माळी, तेली समाजाला पुन्हा आरक्षणात समावेश करण्यात आला. परंतु, १९६८ पासून मराठा समाजाला आरक्षणपासून दूर ठेवण्यात आले आहे. आज मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे माझी भूमिका ही मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे मिळालेल्या एसईबीसी आरक्षण कायम करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यावर आहे. ओबीसीमधून आरक्षण द्या किंवा आर्थिक निकषावर आरक्षण द्या, असे सरकारला पर्याय उपलब्ध करून देऊ नका. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने पूर्व तयारी करून काय जोर लावायचा तो लावावा. पण जर दगाफटका झाला तर आम्ही उत्तर देऊ, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जालना येथे दिला.
जालना येथे राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागर परिषदेचे सोमवारी (ता.२६) आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील सर्व जिल्ह्याचे समन्वयक, सकल मराठा समाजाची उपस्थित होती. आर्थिक निकषावर आरक्षण द्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण देण्यात आले आहे. मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात एसईबीसी आरक्षण मिळाले नाही तर आर्थिक निकषावर आरक्षण द्या, अशी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मागणी केली. तसेच त्य ही विविध मुद्यांवर ही प्रकाश टाकला.
0 टिप्पण्या