जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी घेतली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ

दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी घेतली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथठाणे
केंद्रीय दक्षता आयोगाच्या सुचनेनुसार दि. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत आज  अधिकारी-कर्मचारी यांनी भ्रष्टाचार निर्मूलन शपथ घेतली. यावेळी राज्याचे राज्यपाल श्री. भगत सिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांनी दिलेला संदेश वाचून दाखविण्यात आला. 


सामान्य प्रशासन विभागात उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) अजिंक्य पवार यांनी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना शपथ दिली. त्याचबरोबर उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी सिसोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुभाष भोर, कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) नितीन पालवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) शेषराव बडे, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) समिना शेख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मन पवार, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा एच. एल. भस्मे,  समाजकल्याण अधिकारी रमेश अवचार, महिला व बाल विकास विभाग आदि विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली.


 


दक्षता जनजागृती सप्ताह २०२०" (Vigilance Awareness Week) महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी एक आठवडा 'दक्षता जनजागृती सप्ताहाचे' (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात येते. सन २०२० मध्ये दिनांक २७ ऑक्टोबर २०२० ते ०२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत “दक्षता जनजागृती सप्ताह" साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव असल्याने सामाजिक अंतर, मास्क वापरणे इत्यादी अटींचे पालन करून कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे... दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजीपासून जनजागृती कार्यक्रमास प्रारंभ होईल. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या सुरवातीला घेतली जाणारी शपथ ही महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार दिनांक २७/१०/२०२० रोजी सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयात घेण्यात येईल


त्यानुसार अॅन्टी करप्शन व्युरो, ठाणे परिक्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर विभागामधील शहरी व ग्रामीण परिसरात खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी (उदा बस स्टंन्ड, रेल्वे स्थानक इ) भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत पोस्टर्स   लावण्यात येणार आहेत. भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात "लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे" असे फलक लावणे आवश्यक असून, अॅन्टी करप्शन ब्युरो, कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर, टोल फ्री नंबर लिहिणे आवश्यक आहे. अशा सुचना शासकीय कार्यालयांना दिल्या आहेत. भ्रष्टाचार निर्मुलनाचे कामात जनतेला सहभागी करुन घेण्याकरीता त्याचेकडे "भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या सरकारी नोकराविरुध्द (अधिकारी/कर्मचारी) तक्रार असल्यास नागरीकांनी प्रत्यक्ष खालील पत्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा." असे आवाहन करण्यात आले आहे.


 


अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालयाचा पत्ता :पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. ठाणे मध्यवर्ती कारागृहासमोर, ठाणे (प.) ४००६०१.
अॅन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्रामधील कार्यालयांचे दुरध्वनी व टोल फ्री क्रमांक टोल फ्री क्रमांक - १०६४'
ठाणे कार्यालय -०२२-२०८१३५९८/२०८१३५९९
नवी मुंबई युनिट ०२२-२७८३३३४४
रायगड युनिट ०२१४१-२२२३३१
रत्नागिरी युनिट -०२३५२-२२२८९३
सिंधुदुर्ग युनिट - ०२३६२-२२२२८९
पालघर युनिट - ०२५२५-२९७२९७
ई-मेल - spacbthane@mahapolice.gov.in वेबसाईट - www.acbmaharashtra.gov.in III "


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA