वीजचोरांवर महावितरणची धडक कारवाई, २७ लाख रुपयांची वसुली
आसनगाव, सापगाव, किन्हवलीसह अनेक गावांतील वीजचोरांवर

महावितरणची धडक कारवाई , केली २७ लक्ष रुपयांची वसुली

 


 

शहापूर 
शुक्रवारी भल्या पहाटे महावितरणच्या भरारी पथकाने शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली शहापूर  तालुक्यातील सापगाव गावातील वीजचोरांवर धडक कारवाई केली असून सापगावातील १०२ ग्राहकांच्या विजपुरवठ्याची तपासणी  केली असता १४ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये  सरासरी ५४००० युनिटची  वीजचोरी पकडण्यात आली असल्याची माहिती शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यात शहापूर  तालुक्यातील धसई, किन्हवली, सोगाव, चेरपोली, अल्याणी, गुंडे, खराडे, आसनगाव, साने आशा अनेक गावात सदर पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे  त्यामध्ये २७ लाख रुपये वीजचोऱ्याकडून वसूल करण्यात आले असून या नंतर देखील दैनंदिन अश्या मोहीमा चालू राहणार असल्याचे महावितरण कडून जाहीर करण्यात आले आहे.

         

 वीजचोरीकरणाऱ्या व्यक्तीस  वीज कायदा-२००३ चे कलम १३५ व १२६ नुसार  तीन वर्षांपर्यंतचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद असून  वीज ग्राहकांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. मीटरमध्ये फेरफार करणे, रिमोटचा वापर करणे, आकडे टाकून विजेचा वापर करणे आदी टाळावे, असे आवाहन कटकवार यांनी केले आहे.  विजेचा अनधिकृत वापर टाळून संभाव्य कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे, तसेच महावितरण तर्फे ग्राहकांना अधिकृत विजपुरवठा करण्यासाठी मागणी केल्यानुसार केवळ दोन दिवसात विज जोडणी करून देणार असल्याचे शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी सांगितले आहे.    या धडक मोहिमेत सहाय्यक अभियंता वाघ, बाबानांगरे, आंबूर्ले, कदम, खैतापूरकर व शहापूर विभागाचे मुख्य तंत्रज्ञ,वरिष्ठ तंत्रज्ञ,सुरक्षा रक्षक असे एकूण २० लाईनस्टाफ उपस्तिथ होते. 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA