पूणे करार दिनानिमित्त
राज्यभर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे लक्षवेधी निदर्शने-
दिनाक २४ सप्टेबर २०२० रोजी मा. पंतप्रधान, राष्ट्रपती व राज्यसरकार यांना निवेदने.
मुंबई
दिनाक २४ सप्टेंबर, १९३२ रोजी काँग्रेस गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यामध्ये एक करार झाला त्यास पूणे करार म्हणतात ज्याव्दारे डॉ. आंबेडकरांनी गांधीचे प्राण वाचविले परंतू एम. के. गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वासघात करीत स्वतंत्र मतदारसंघ हिसकावून घेतले व एस.सी,एस.टी.च्या माथी संयुक्त मतदार लादले. जे घटनेतील कलम क्रमांक ३३०, ३३२ नुसार सुरू असून देशभरातील एस.सी.-एस.टी.चे खासदार-आमदार निवडले जातात ते बहुंताशी नॉन एस.सी., एस. टी. मतदारव्दारेच म्हणून हे आमदार-खासदार यांची बांधीलकी एकतर त्यांच्या पक्षाशीच किंवा सवर्ण वर्गाशीच होते व ते ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात ते मात्र उपेक्षित-दुर्लक्षित राहतात. एकप्रकारे घटनात्मक आरक्षण धोरणाचा हा पराभव असल्यामुळे यावरती त्वरीत उपाययोजना करने आवश्यक आहे व त्यासाठी घटनादुरूस्ती आवश्यक असल्याने याबाबतचे सविस्तर निवेदन दिनाक २४ सप्टेबर २०२० रोजी देशाचे राष्ट्रपती-पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी व्दारा देण्यात येणार आहे व त्यानंतर हे निवेदन सर्व राष्ट्रीय व इतर पक्षप्रमुखांना देखील देण्यात येणार आहे.
तसेच २४ सप्टेबर २०२० रोजी या शांततामय लक्षवेधी निदर्शनादारे राज्यातील जनतेच्या कोविड-१९ बाबत समस्या, राज्यातील मागासवर्ग कर्मचारी यांचे प्रलंबित पदोन्नती याबाबत सरकारची भूमिका, विदर्भातील व महाराष्ट्रातील इतर भागातील पूरग्रस्तांना शासनाची त्वरीत मदत, राज्यसरकारव्दारा मुस्लिमांना आरक्षण, अनु जाती-जमाती यांच्यासाठी वार्षिक आर्थिक नियोजन, भटके विमुक्त यांची क्रमीलियरच्या जाचातून मुक्तता, अशा इतर महत्वपूर्ण विषयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे संस्थापक अध्यक्ष अॅड. . (डॉ.) सुरेश माने यांच्या आदेशानुसार कोवीड-१९ व लॉकडाऊनचे सर्व नियम यांचे पालन करून दुपारी १२.३० पासून ते सांयकाळी ४.३० वाजेपर्यंत लक्षवेधी निदर्शने केल्यानंतर सांयकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी यांचे मार्फत ही निवेदने पाठविण्यात येणार आहेत.
राज्यात ही लक्षवेधी निदर्शने मुंबई (कोकण विभाग) पूणे (पश्चिम-महाराष्ट्र) औरंगाबाद (मराठवाडा) धुळे (उत्तर महाराष्ट्र) व नागपूर (विदर्भ) या पाच- शहरात केली जाणार असून राज्यातील प्रमुख पदाधिकारी याची नेतृत्वे करणार आहेत. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे, पक्षसंस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. (डॉ.) सुरेश माने यांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडी घटक पक्ष आहे तरीसुध्दा राज्यातील जनतेप्रती पक्षाची बांधीलकी सर्वश्रेष्ठ स्विकारून वांरवार केंद्र व राज्य सरकारचे लक्ष जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर वेधण्यात येत आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीव्दारा राज्यभर गेले तीन महिने सतत राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिलदारमार्फत राज्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर केंद्र सरकारला निवेदने व राज्यातील महाआघाडी सरकारला स्मरणपत्रे सादर करण्यात आली आहेत. ज्यामध्ये राज्यातील मागासवर्ग कर्मचारी पदोन्नती, लाईट बिले, विद्यार्थी समस्या, शहरातील एस.आर.ए. समस्या, ओबीसी जनगणना, भटके विमुक्ताची क्रेमीलियर मधून मुक्तता, मुस्लीम आरक्षण, एक कूटूब एक सरकारी नोकरी, आमदार-खासदारांना क्रेमीलियर लावून पेन्शन देणे वगेरे बाबींचा समावेश आहे.
0 टिप्पण्या