Top Post Ad

मनसेचे लोकलमधून विना तिकीट, विना परवानगी प्रवास आंदोलन

सोमवारी लोकलमधून विना तिकीट, विना परवानगी प्रवास
मनसेचा सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा निर्णय


मुंबई
मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठीच लोकलच्या प्रवासाची मुभा असल्याने बस आणि एसटी वाहतुकीवर ताण येत आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. लोकलमध्ये प्रवास करण्यास परवानगी नसल्याने एसटी आणि बसमध्ये लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे लोकलमधून सर्व सामान्यांनाही प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली होती. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर मुंबईतील बसच्या गदीर्चा व्हिडिओ पोस्ट करून सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला होता. मात्र, मनसेच्या इशा-यानंतरही सरकारने काहीच हालचाल न केल्याने मनसेने अखेर सोमवारी लोकलमधून विना तिकीट, विना परवानगी प्रवास करून सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला आहे.


या संदर्भात संदीप देशपांडे यांनी म्हणाले, कोरोना काळात राज्यसरकारने लोकल सेवा बंद ठेवली होती. मात्र, त्यानंतर पुनश्च हरिओम म्हणत सरकारने अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवास करण्यास मुभा दिली. उद्योग-धंदेही सुरू झाल्याने पालघर, ठाणे, कल्याण, कर्जत-कसा-याहून मुंबईला येणा-या चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रवाशांना बसच्या प्रचंड गदीर्तून आठ तास प्रवास करत जावे लागत आहे. बस आणि एसटीतील या गर्दीमुळे कोरोना होत नाही का?, असा सवाल करतानाच जनतेच्या हितासाठी सर्व सामान्यांसाठी लोकलमधून प्रवासास परवानगी देण्यात यावी,


काही दिवसांपूर्वीच विरार रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी प्रचंड आंदोलन केले होते. तसेच या आधीही भाईंदर आणि डोंबिवली स्थानकावर आंदोलन करण्यात आले होते. ही आंदोलने प्रवाशांनी केली होती. मात्र प्रशासनाने या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर आता मनसेने हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.  बाहेरच्या राज्यातून आणि बाहेरच्या देशातून लोक महाराष्ट्रात येऊ शकतात त्याच्यासाठी स्पेशल train आणि एरलाइन चालू ठेवले आहे जे लोक बाहेरून येतात आहे त्याना टेस्ट करून परत महाराष्ट्रात आणतात आहे का...त्याच्यातिकडे कोणतेही त्याची टेस्ट होत त्याच्यामधून corona पसरणार नाहीं कां... बाहेरून येणाऱ्या सर्व train आणि airline  बंद करून फक्तं महाराष्ट्रामध्ये जिल्यातून ..जिल्यात बस ..train.. आणि सामान्य माणसांसाठी लोकल Train चालू केल्या पाहिजे... ..सामान्यलोकांसाठी train चालू करा... आता आपल्याला corona बरोबर जगायचे आहे... corona काहि जाणार नाहीं आहे.. कीती लोकांच्या नोकऱ्या घेल्या आहेत.. कीती लोकाना पगार नाहीं आहे.. निदान कामाला जाणाऱ्या लोकांचे हाल तरी होऊ नये अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करित आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com