कोरोना रुग्णांकरिता कमी खर्चात उपचार सुविधा
निःस्वार्थ हॉस्पीटलचा उपक्रम; आता पर्यंत ११०० रुग्ण कोरोना मुक्त
मुंबई
देशात कोरोना रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत आहे. अशा परिस्थितीत लाखांमध्ये येणा-या बिलाची चिंता कोरोना बाधीत रुग्णांना सतावत असते. हाच मुद्दा लक्षात घेत निःस्वार्थ हॉस्पीटलचे डायरेक्टर डॉक्टर महाबली सिंग आणि त्यांची पत्नी डॉक्टर ज्योती महाबली सिंग यांनी कमीत कमी बिलात कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. एप्रिल महिन्यांच्या सुरवातीपासून म.न.पा आयुक्तांना सांगून आपले दोन्ही हॉस्पीटल, निःस्वार्थ हॉस्पीटल आणि स्टार हॉस्पिटल डॉ. महाबली सिंग यांनी कोविड सेंटर बनवलं होत. डॉक्टर महाबली सिंग आपल्या सहका-यांबरोबर आपलं तिसरं लाईफ केअर हॉस्पीटल येथे कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. तसेच रुग्णांना समुपदेशन करुन ज्या रुग्णांच्या शरीरामध्ये एंटीबॉडी आहेत अश्या रुग्णांना गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना प्लाज़्मा दान करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत.
रुग्णांना कमीत कमीत रुपयांमध्ये उपचार देऊन आपला मानव धर्म आणि वैद्यकीय कर्तव्य बजावत आहेत. हॉस्पिटलमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना कोरोनाविषयी भयमुक्त करून रुग्णांची सेवा करण्यासाठी तयार करणे हे मोठ जिकरीचे काम होते.अशी प्रतिक्रिया डॉ महाबली सिंह यांनी दिली.
मंगलमूर्ति लेन विरार (पश्चिम) येथील निःस्वार्थ हॉस्पिटल मध्ये रुग्णांसाठी वापरण्यात येणारे पीपीई किट आणि त्यांच्या उपचारा दरम्यान येणा-या डॉक्टरांचे विजिट चार्ज मोफत केले. कोरोना रुग्णाच्या गंभीर अवस्थेत ज्या रुग्णांना ऑक्सीजन दिल जात अश्या रुग्णांना पतिदिनी तीन हज़ार पांचशे प्रमाणे १० दिवस ऑक्सीजनची किंमत पस्तीस हज़ार प्रमाणे लावली जाते. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागतर्फे अश्या रुग्णांसाठी सात हज़ार प्रतिदिन खाजगी रुग्णालयासाठी वापरण्याची परवानगी आहे म्हणजे दहा दिवसाचे सत्तर हज़ार घेऊ शकतात. कोरोना रुग्ण ज्यांना वेंटीलेटरची आवश्यकता असते अशा रुग्णांना प्रतिदिनि पांच हज़ार प्रमाणे म्हणजे १० दिवसाचे पन्नास हज़ार रुपये घेऊ शकता। महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग तर्फे अश्या रुग्णांसाठी नउ हज़ार प्रतिदिनि खाजगी रुग्णालय साठी वापरण्याची परवानगी आहे म्हणजे दहा दिवसाचे नव्वत हज़ार घेऊ शकतात. Asymptomatic रुग्णांना डॉ महाबली सिंह घरी क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देतात. सर्व सामान्य रुग्णांचा सेवे मध्ये पंधरा ते वीस हज़ार प्रमाणे निःस्वार्थ हॉस्पिटल मध्ये सेवा दिली जाते जे डेंगू मलेरिया आणि टाइफोइड या खर्चा इतकाच खर्च होतो.
0 टिप्पण्या