आगामी काळात सुरक्षित मालमत्तेची मागणी कमी होऊ शकते

आगामी काळात सुरक्षित मालमत्तेची मागणी कमी होऊ शकते


२०२० हे वर्ष सुरु झाल्यापासून आतापर्यंत (४ सप्टेंबर २०२०), यूएसडी जेपीवाय जोडीने १.७७ टक्के मूल्य गमावले. तर जेपीवायआएनआरचे मूल्य जवळपास ३.९६ टक्क्यांनी घटले. डॉलर निर्देशांकात याच काळात ३.८७ टकक्यांची घसरण झाली. तथापि, ऑगस्टच्या सुरुवातीपासून यूएसडीजेपीवायने ०.२२ टक्क्यांचे मूल्य कमावले आणि जेपीवायआएनआरने २.७४ टक्क्यांची वाढ याच काळात घेतली. जेपीवायआएनआरमध्ये नुकत्याच झालेल्या सुधारणेमुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये जोखीम पत्करण्याच्या भावनेत वाढ दिसून आली. अमेरिकी एफडीएने कोव्हिड-१९ च्या रुग्णांसाठी काही प्लाझ्मा थेरपींच्या उपचारांना मान्यता दिल्याने हे सकारात्मक बदल दिसून आले.


जपानच्या जीडीपीत २०२० च्या दुस-या तिमाहित २७.८% ची घट:
वार्षिक आकडेवारीनुसार, २०२० मधील दुस-या तिमाहीत जपानच्या अर्थव्यवस्थेत २७.९ टक्क्यांची घट झाली. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आर्थिक कामकाज ठप्प झाल्यानंतर जपानमधील ही तीव्र घट होती. तथापि, विषाणूचा फैलाव होण्यापूर्वीच अर्थव्यवस्थेवर अमेरिका-चीनमधील व्यापारी तणाव आणि उपभोग कर वाढीचा परिणाम मागील वर्षी झाला होता. एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने आपत्कालीन स्थिती जाहीर केली तेव्हा जपानी अर्थव्यवस्थेचे आणखी नुकसान खालावले. कार आणि ऑटो पार्ट्सची निर्यात करणारा जपान हा प्रमुख देश आहे. जगातील प्रमुख शहरांमध्ये कठोर लॉकडाऊन असल्यामुळे या उत्पादनांची जागतिक मागणी घटली. या तिमाहीत विदेशी पर्यटकांच्या खर्चासह वस्तू व सेवांच्या निर्यातीत १८.५ टक्के घट झाली. जपानमधील कोरोना व्हायरसच्या रुग्णांमधील वाढीमुळे लोक बाहेर पडण्याचे धाडस करत नाहीयेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विषाणूवर नियंत्रण मिळवणा-या सुरुवातीच्या काही देशांमध्ये जपानचा समावेश होता. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून विषाणूची दुसरी लाट देशत पसरली.


बीओजे अल्ट्रा-इझिंग चलन धोरण राखणार:
बँक ऑफ जपानने नुकत्याच झालेल्या बैठकीत इशारा दिला की, साथीच्या आजाराच्या आर्थिक परिणामातून होणारी सुधारणा मर्यादित असेल व त्यासाठी विलंब होऊ शकेल. तसेच या उद्रेकावर नियंत्रण मिळवण्यास किती वेळ लागेल, हे सांगणेही कठीण आहे. कित्येक वर्षे अत्यल्प व्याजदारमुळे व्यापारी बँकांवरही ताण आला आहे. परिणामी आणखी दर कपात केल्याचा उलट परिणाम होऊन, बँकांच्या कर्ज देण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल, अशी भीती निर्माण झाली आहे. मात्र, बीओजेने आश्वासन दिले आहे की, ते पत समर्थन कायम ठेवतील, कारण व्यवसायांना पतपुरवठा करणे ही मध्यवर्ती बँकांसाठीची प्राथमिकता आहे.


आउटलुक:
कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचारासाठी अमेरिकी एफडीएने मंजुरी दिल्यांनतर जगात जोखीमीची भावना दिसून येत आहे. जोखीमीत सुधारणा दिसूनही वास्तविक आर्थिक सुधारणा अजूनही दूर आहे, कारण जगभरातील दैनंदिन रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच भारतात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अमेरिकेच्या पुढे गेली आहे. मागील काही दिवसात ती दररोज ८०,००० च्या पुढे होती.साथीच्या काळातच, शिंझो आबे यांनी आरोग्याची कारणे दाखवून जपाननच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.


शिंझो आहे हे जपानच्या इतिहासात सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान आहेत.सुरुवातीला विषाणूपासून मुक्त होऊ शकलेल्या देशांमध्ये जपानचाही सहभाग होता. मात्र आता या देशांमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे व्ही आकारातील सुधारणेच्या अपेक्षांवर परिणाम होईल.आर्थिक सुधारणा आणि जोखीमीची भूक यांचा लंबक आता लस निर्मात्यांच्या हाती आहे. जगाला जेवढ्या वेगाने लस मिळेल, तेवढी लवकर आर्थिक सुधारणा होऊ शकते. म्हणूनच, जेपीवायआयएनआर (सीएमपी:६९) स्पेक्ट्रमच्या खालच्या टोकाकडील ६८ वरून सप्टेंबर २०२० च्या अखेरीस स्पेक्ट्रमच्या उच्च टोकावर म्हणजेच ७० पर्यंत पोहोचेल.


(लेखक:  वकार जावेद खान, रिसर्च अॅनलिस्ट, एंजल ब्रोकिंग)टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA