ठाणे
भाजप प्रणित केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाल्या आहे. कोरोना काळातही या सरकारकडून जनतेला कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकलेली नाही. याविरोधात युवक कॉंग्रेसच्या वतीने 'रोजगार दो' अशा घोषणा देत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर १० सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले "मोदी सरकार रोजगार दो'च्या घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. यावेळी वाढत्या बेरोजगारीच्या समस्येकडे सोयीस्करपणे डोळेझाक करणाऱ्या केंद्र सरकारने युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या कामाकडे लक्ष द्यावे यासाठीचे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .
कोरोनामुळे लोकडाऊन करण्यात आल्याने देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यामुळे रोज करोडो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत मागील ७० दिवसात १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत असे असताना मोदी सरकार सुशांत सिंग,कंगना राणावत यासारख्या मुद्द्यांना रोज पुढे आणून मुळ मुद्द्यांना बगल देत आहे. परंतु करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात लोक आत्महत्या करतात याबाबत मात्र प्रधानमंत्री काही बोलत नाही म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करत असल्याचे यावेळी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले. आज केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांमुळे देशात अराजकता माजली असून देशाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने तरुणांना रोजगार त्वरित उपलब्ध करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रभारी हरपाल सिंह,महाराष्ट्र कोकण विभाग प्रभारी व सचिव प्रदीप सिंघवी,महाराष्ट्र उपाध्यक्ष ब्रिजदत्त महाराष्टाचे प्रवक्ते अनंत सिंग, रिषिका राखा, ठाणे शहर काँगेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी, महिला अध्यक्ष शिल्पा सोनोने आदीसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या