Top Post Ad

ठाणे महापालिकेच्या धडक मोहिमेत १२ बांधकामे आणि २२१ हातगाडी, टपऱ्यांवर कारवाई

अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहिम सुरू
१२ बांधकामे आणि २२१ हातगाडी, टपऱ्यांवर कारवाई


ठाणे
लॅाकडाऊन काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांविरूद्ध 3 सप्टेंबर रोजी संपूर्ण ठामपा हद्दीत जोरदार मोहिम हाती घेण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण १२ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली तर २२१ हातगाड्या,गॅरेजेस आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. परिमंडळ उप आयुक्त आणि सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक यांनी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण पथकांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दुसऱ्या दिवसीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.      


 दुपारपासून पोलिस बंदोबस्तात या कारवाईला सुरूवात झाली. या कारवाईमध्ये नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत आंबेडकर रोड येथील तळ अधिक एक मजल्याचे आरसीसीचे वाढीव बांधकाम आणि २१ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. वर्तकनगर प्रभाग समितीतंर्गत आज केलेल्या कारवाईमध्ये भीमनगर येथील दोन बांधकामे आणि २२ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतंर्गत दोन वीट बांधकाम, चार पत्र्याच्या शेडस् आणि १९ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली तर उथळसर प्रभाग समितीतंर्गत आज ३७ हातगाडी, टपऱ्या व गॅरेजेसवर कारवाई करण्यात आली.


      वागळे प्रभाग समितीतंर्गत एकूण १७ हातगाडी व टपऱ्यांवर तर लोकमान्यनगर-सावरकर नगर प्रभाग समितीतंर्गत एकूण ५७ हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. कळवा प्रभाग समितीतंर्गत लॅाकडाऊन काळात झालेल्या तळ अधिक दोन मजली इमारतीचे बांधकाम तोडून टाकण्यात आले तर एकूण २१ हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली तर मुंब्रामध्ये तळ अधिक सात मजली इमारतीचे वरील दोन मजल्यांचे बांधकाम तोडण्यात आले तर २७ हातगाडी व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दिवा प्रभाग समितीमध्ये आज करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तळ अधिक चार मजली इमारतीचे वाढीव दोन मजल्याचे बांधकाम पूर्णतः तोडून टाकण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1