Top Post Ad

भारतीय विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी कॅनडा आणि आयर्लंडला पसंती

उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडा आणि आयर्लंडला पसंती


मुंबई
कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर विदेशात उच्च शिक्षणासाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांच्या पसंतीविषयी सर्वेक्षणाचा निकाल एडवॉयने जारी केला. या एज्युकेशन कन्सल्टन्सी प्लॅटफॉर्मने ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड या ४ अभ्यास केंद्रांवर ४००० भारतीय विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. या अभ्यासात असे दिसून आले की, ३५% विद्यार्थ्यांना सप्टेंबर २०२० मध्ये उच्च शिक्षणासाठी कॅनडाला जाण्याची इच्छा आहे. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांनी आयर्लंडला पसंती दिली.याउलट, सर्व्हेमध्ये असेही दिसून आले की, कॅनडापाठोपाठ जानेवारी २०२१ मध्ये परदेशात शिकायला जाणा-या विद्यार्थ्यांनी अमेरिकेला सर्वाधिक पसंती दिली. सर्व्हेमध्ये असे दिसले की, ४३ टक्के विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील शिक्षण सुरू ठेवण्याचे ठरवले आहे तर ३५ टक्के विद्यार्थ्यांनी कॅनडासाठी नियोजन केले आहे.


जागतिक लॉकडाऊनमुळे प्रवास बंदी तसेच क्वारंटाइन प्रक्रियेत अनेक शिक्षण संस्था बंद राहिल्या. या परिस्थितीवर मार्ग म्हणून, अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थअयांनी संमिश्र शिक्षण मॉडेलचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. सर्व्हेत असे दिसून आले की, ४२ टक्के विद्यार्थ्यी, ज्यांना ब्रिटनमधील विद्यापीठात शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांनी संमिश्र शिक्षणाला पसंती दिली आहे. प्रत्यक्ष शिकवणे आणि ऑनलाइन शिकवण्याचे हे मिश्रण आहे.मागील महिन्यात, युके होम ऑफिसनेही घोषणा केली की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी त्यांचा अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू करू शकतात. एप्रिल २०२१ मध्ये ते पदवी शिक्षणणासाठी पात्र ठरू शकतात. शिक्षण प्रक्रियेत सुधारणा होईपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी ही ‘ब्लेंडिंग लर्निग’ प्रक्रिया स्वीकारली आहे.


एडवॉयचे संस्थापक आणि सीईओ सादिक बाशा म्हणाले,
'परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करतो. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षणास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या निर्णयावर कसा परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी हा सर्व्हे घेण्यात आला. आम्ही या गोष्टीचा पुनरुच्चार करू इच्छितो की, सध्याच्या संकटाच्या काळात आम्ही विद्यार्थी आणि उच्च शिक्षण समुदायासोबत आहोत. त्यांना मदत करण्याची खूप गरज आहे. भविष्याचा योग्य निर्णय घेण्यास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा अंदाज आम्ही घेत आहोत.”


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com