Top Post Ad

भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले दु:ख



ठाणे
भिवंडी, मुंबई येथे इमारत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती म्हणाले की ही घटना त्रास देणार आहे. ते म्हणाले की या दु: खाच्या घटनेत ते मृतांच्या कुटुंबासमवेत आहेत. कोविंद यांनी जखमींना लवकर बरे होण्याची शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासनाने बचाव व मदत कार्यात सहकार्य करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की या घटनेमुळे त्यांना दु: ख झाले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींचे लवकर आरोग्य होण्याची शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले की, मदत आणि बचाव कार्य चालू आहे. ते म्हणाले की, बाधित लोकांना सर्वतोपरी मदत केली जाईल.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही  दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोलले असून बचाव कार्य व्यवस्थित व काळजीपूर्वक पार पाडण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.



भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली तसेच बचावकार्याचा आढावा घेतला.  एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.  जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पालकमंत्र्यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.


इमारत दुर्घटनेबाबत नारपोली पोलीस ठाण्यात सदर इमारतीचे मालक सय्यद अहमद जीलानी याच्याविरुद्ध भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अधिकारी यांचे तक्रारीवरून भा. द. वि. कलम ३३७, ३३८, ३०४(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.


 

१७:०० वाजेपर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:*

१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)

२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)

३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)

४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)

५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)

६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)

७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)

८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)

९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)

१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)

११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)

१२) आमीर मुबिन शेख (पु/१८ वर्ष)

१३) आलम अन्सारी (पु/१६ वर्ष)

१४)अब्दुला शेख(पु/८वर्ष)

१५) मुस्कान शेख(स्री/१७वर्ष)

१६) नसरा शेख(स्त्री/१७वर्ष)

१७) इंब्राहिम(पु/५५वर्ष)

१८)खालिद खान(पु/४० वर्ष)

१९) शबाना शेख(स्त्री/५०वर्ष)

२०) जारीना अन्सारी (स्त्री/४५)

 

*मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:*

१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)

२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)

३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)

४)बब्बू(पु/२७वर्ष)

५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)

६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)

७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)

८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)

९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)

१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)

११) नाजो अन्सारी (स्त्री/२६)

१२) सनी मुल्ला शेख (पु/७५)


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com