कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा अनुपस्थितीचा कालावधी "कर्तव्य कालावधी" म्हणून गृहित धरावा

कोरोनाबाधित महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुपस्थितीचा कालावधी 
हा "कर्तव्य कालावधी" म्हणून गृहित धरावा - महापौर नरेश म्हस्केठाणे
काही ठा.म.पा. अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने, काही रुग्णांना रुग्णालयात तर काही रुग्णांना महानगरपालिकेने दाखल केलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात (Institutional Isolation) दाखल करण्यात आले आहे. तसेच काही रुग्णांना घरीच विलगीकरण (Home Isolation)  करुन राहणेसाठी सुचित करण्यात आले आहे. अशा प्रकारे कोरोना विषाणू (कोव्हीड 19) चा संसर्ग होऊन कोरोनाबाधित झालेल्या  ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील तसेच कंत्राटी,ठोक मानधनावरील अधिकारी व कर्मचारी यांची सदर कालावधीतील अनुपस्थिती ही गैरहजेरी न धरता "कर्तव्य कालावधी" म्हणून मानण्यात यावा. यामध्ये कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज घेण्यात येऊ नये व त्यांच्या वेतनात कोणतीही कपात न करता त्यांना संपूर्ण वेतन अदा करण्यात यावे, अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्या विनंती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला केली आहे. 


कोव्हीड 19 प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी उपाय योजना केल्या जात असतांना महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अथक परिश्रम घेऊन काम करत आहेत. कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून पहिल्या दिवसापासूनच अधिकारी व कर्मचारी हे लॉकडाऊन कालावधीत सुध्दा सेवा बजावत होते याचा विचार करून कोरोना बाधित ठा.म.पा. अधिकारी व कर्मचारी यांच्या दृष्टीने वरील निर्णय घेऊन कार्यवाही करणे जरुरीचे आहे. अशा प्रकारची कार्यवाही केल्यास ठा.म.पा. अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळून जोमाने कामे करतील, व कोरोनाचा सामना सक्षमतेने होईल, सबब, वरील प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना सुचित करावे. या प्रकरणी काय कार्यवाही केली जात आहे त्याबाबत मला अवगत करावे, असेही महापौरांनी पत्रामध्ये नमूद केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या