Top Post Ad

टोल भरण्याकरिता आयसीआयसीआयसी बँकेने उपलब्ध केली फास्टटॅगची सुविधा

टोल भरण्याकरिता आयसीआयसीआयसी बँकेने दिली फास्टटॅगची सुविधा


मुंबई:


आयसीआयसीआय बँकेने महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएसआरडीसी) सहयोगाने नवी मुंबईतील वाशी टोल प्लाझा येथे फास्टॅग तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध केल्याचे आज जाहीर केले आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना कोणत्याही बँकेकडून घेतलेल्या फास्टॅगच्या मदतीने सुरळितपणे व सोयीस्करपणे टोल भरता येईल आणि विनासायास प्रवास करता येईल. ही क्रिया पूर्णतः काँटॅक्टलेस असून, ती कोविड-19 महामारीच्या काळामध्ये प्रवाशांची सुर क्षतता जपणार आहे. यामुळे, वाशी टोल प्लाझा येथे फास्टॅग सुविधा देणारी आयसीआयसीआय बँक ही पहिली बँक ठरली आहे. बँक लवकरच ऐरोली, दहिसर, मुलुंड व ठाणे या मुंबई उपनगरांतील टोला प्लाझावर फास्टॅग सेवा सुरू करणार असल्याची माहिती आयसीआयसीआय बँकेच्या अनसिक्युर्ड अॅसेट्सचे प्रमुख सुदीप्त रॉय यांनी दिली.


या उपक्रमाविषयी बोलताना सुदीप्त रॉय म्हणाले, “वाशी टोल प्लाझा येथे फास्टॅग तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी एमएसआरडीसी, आयएचएमसीएल, एनपीसीआय व टोल प्लाझा ऑपरेटर एमईएम इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याशी सहयोग करणे, ही आयसीआयसीआय बँकेसाठी अभिमानाची बाब आहे. मुंबई - वडोदरा मार्गावर ही नावीन्यपूर्ण सर्वप्रथम आयसीआयसीआय बँकेने सुरू केली. आम्ही या बाबतीत यशस्वीपणे काही प्रमाणके निर्माण केली असून, त्यांचा वापर आता सर्वं बँकांदरम्यान इंटर-ऑपरटेबिलिटी ही सुविधा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय प्रमाणके म्हणून केला जात आहे. फास्टॅग उपक्रम अन्य काही नावीन्यपूर्ण मार्गांनी वापरता येतो का, हे पाहण्यासाठी आम्ही विविध भागीदारांशी सहयोग करत आहोत. याचाच एक भाग म्हणून, देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांतील मॉल व विमानतळे येथे येत्या काही महिन्यांत फास्टॅग-आधारित काँटॅक्टलेस पर्किंग सेवा सुरू करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. बँकेने ही सुविधा जीएमआर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केलेली आहे.”


एमएसआरडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी या उपक्रमाविषयी बोलताना नमूद केले, “आरजीएसएल (राजीव गांधी सी लिंक) येथे यशस्वीपणे फास्टॅग बसवल्यानंतर आम्ही वाशी येथे फास्टॅग सेवा उपलब्ध केली आहे. वाशी हा मुंबईत येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी एक महत्त्वाचा टोल प्लाझा आहे. येत्या काळामध्ये ईटीसी सेवा दहिसर, ठाणे, ऐरोली व मुंबई येथेही सुरू केली जाणार आहे. 'अनलॉक 4.0' लागू झाल्यानंतर पुन्हा रहदारी वाढली आहे आणि प्रवाशांना टोल भरण्या त व काँटॅक्टलेस पर्याय उपलब्ध करायचा असेल तर फास्टॅगसारखे डिजिटल पर्याय अतिशय गरजेचे आहेत."


 “ईटीसी क्षेत्रातील आमची वाटचाल 2012 मध्ये सुरू झाली. एमएसआरडीसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही आरजीएसएल (राजीव गांधी सी लिंक) येथे पहिली क्लोज्ड लूप ईटीसी सिस्टीम बसवली आणि त्यानंतर ही सेवा मुंबईत प्रवेश करण्याच्या ठिकाणांच्या 5 टोल प्लाझांवर बसवली. देशभर अवलंबल्या जाणाऱ्या एनईटीसी फास्टॅग उपक्रमासाठी क्लोज्ड लूप ईटीसी सिस्टीम वापरली जाणार आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. इंटरऑपरेबल एनईटीसी फास्टॅग उपक्रमामुळे प्रवाशांना जवळच्या कोणत्याही शहरातून राष्ट्रीय महामार्गाद्वारे मुंबई शहरामध्ये सुरळित प्रवेश करता येईल.” असे मत या उपक्रमाविषयी एमईपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर यांनी मांडले.


या उपक्रमाविषयी एनपीसीआयच्या सीओओ प्रवीणा राय म्हणाल्या, “आयसीआयसीआय बँकेच्या सहयोगाने वाशी टोल प्लाझा येथे एनईटीसी फास्टॅग सुविधा सुरू करण्यामध्ये सहभागी होताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना सुरक्षित, काँटॅक्टलेस व सोयीस्कर पद्धतीने टोल भरता येणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सुसूत्रीकरण आणण्यासाठी एनईटीसी फास्टॅग सुविधा हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे मला वाटते. सध्याची कोविडची परिस्थिती पाहता, देशातील नागरिकांच्या दृष्टीने सुरक्षा हा सर्वाधिक प्राधान्याचा मुद्दा आहे. एनईटीसी फास्टॅग या सुविधेमुळे प्रवाशांना काँटॅक्टलेस आणि कोणत्याही जोखीमविना प्रवास करता येईल, अशी अपेक्षा आहे.”


फास्टॅग हे बँडनेम इंडिया हायवेज मॅनेजमेंट कंपनी लि.च्या (आयएचएमसीएल) मालकीचे असून त्याद्वारे नॅशनल हायवे अथॉरिटीज ऑफ इंडियाचे (एनएचएआय) इलेक्ट्रॉनिक टोलिंग व अन्य संबंधित प्रकल्प हाताळले जातात. रेडिओफ्रिक्वेन्सी आयडेण्टि फकेशन डिव्हाइस (आरएफआयडी) टॅग वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. हा टॅग वापरण्यास सोपा आहे व तो रिचार्ज करता येतो. त्यामुळे टोलचे पैसे आपोआप वळते केले जातात. त्यासाठी वाहनांना टोल प्लाझावर थांबून व्यवहार करावा लागत नाही. ज्या प्रवाशांकडे प्रवासी वाहने आहेत त्यांना बँकेने वाशी टोल प्लाझा येथे बसवलेल्या पॉइंट ऑफ सेल सेंटरवर फास्टॅग खरेदी करता येईल. याचबरोबर, आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बैं कंग, आयमोबाइल अॅप, इन्स्टाबिझ अॅप, पॉकेट्स अॅप अशा बँकेच्या डिजिटल चॅनलच्या माध्यमातून किंवा बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन फास्टॅग मिळवता येऊ शकतो. बँकेचे इंटरनेट बैं कंग, यूपीआय व एनईएफटी याद्वारे फास्टॅग पुन्हा सहजपणे लोड करता येऊ शकतो.


आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक नसणाऱ्या प्रवाशांना पॉकेट्स अॅप वापरून किंवा www.icicibank.com/fastag येथे जाऊन फास्टॅग खरेदी करता येऊ शकतो. आयसीआयसीआय बँक मूल्य आणि फास्टॅगवरील सरासरी दैनंदिन व्यवहार या दोन्ही बाबतीत आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनमध्ये (ईटीसी) आघाडीवर आहे. ऑगस्ट 2020 मध्ये, बँकेने सरासरी दैनंदिन व्यवहारांच्या मूल्याच्या बाबतीत जवळजवळ 40% बाजारहिस्सा मिळवला. बँकेने त्या महिन्यात दररोज 20 लाखांहून अधिक व्यवहार नोंदवले. फास्टॅग या सुविधेमुळे वाहनधारकांना फास्टॅग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व टोल प्लाझांवर एकच टॅग वापरून टोलचे पैसे देणे शक्य होते. सध्या, बँक राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर 220 टोल प्लाझावर सेवा देते. सध्या फास्टॅग उपक्रमांतर्गत सुरू असणाऱ्या एकूण टोल प्लाझांपैकी 32% यामध्ये समाविष्ट आहेत.


आयसीआयसीआय बँक लि. (BSE: ICICIBANK, NSE: ICICIBANK and NYSE:IBN) ही भारतातील आघाडीची खासगी बँक आहे. 31 मार्च 2020 पर्यंत, बँकेची एकूण मालमत्ता 13,77,292 कोटी रुपये होती. आयसीआयसीआय बँकेच्या उपकंपन्यांमध्ये आघाडीच्या खासगी विमा कंपन्या, संपत्ती व्यवस्थापन व सिक्युरिटीज ब्रोकरेज कंपन्या समाविष्ट आहेत आणि ही देशातील सर्वात मोठ्या खासगी इक्विटी फर्मपैकी एक आहे. बँक भारतासह 15 देशांमध्ये कार्यरत आहे.


 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com