मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण डास

मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण डास


जगभरातील मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण डास आहेत. दरवर्षी सुमारे १० लाख लोक डासांमुळे होणाऱ्या आजारांनी मृत्युमुखी पडतात. या जीवाने जगाला हैराण करुन सोडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मलेरिया अहवाल २०१७ नुसार, दक्षिण पूर्व आशियात सर्वात जास्त ८७ टक्के मलेरियाचे रुग्ण आढळले. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार २०१५ मध्ये जगभरात मलेरियामुळे ४.३८ लाख लोक मरण पावले आहेत. गेल्या ३० वर्षांत डेंग्यूच्या संसर्गामध्ये ३० पट वाढ झाली आहे.


जगभरात ३५०० पेक्षा जास्त प्रजाती, शंभराहून अधिक धोकादायक
विज्ञानाची तयारी

ऑक्सफोर्ड विद्यापीठ बायोटेक कंपनी ऑक्सिटेकसोबत मिळून एडीज एजिप्ट डासाच्या जीनमध्ये बदल करून नर मादीचा जीव तयार करत आहे. यातील जीन नवीन पिढीला विकसित होऊ देणार नाही.


सर्वात धोकादायक प्रजाती कोणत्या?
भारतात डासांचे अॅनोफ्लीज, क्युलेक्स, एडीज आणि मॅनसोनिया हे चार समूह आढळतात


अॅनोफ्लीज : भारतात याच्या ५८ प्रजाती आढळतात. यापैकी ५ धोकादायक मलेरियाच्या वाहक आहेत. यापैकी स्टीफेन्सी, फ्लुव्हिटालिस व डायरस मुख्य आहेत. अ‍ॅनोफ्लीज स्वच्छ पाण्यात अंडी घालतात.


एडीज : हे डास जगभर आढळतात. हे डेंग्यू आणि चिकुनगुण्या हे आजार पसरवतात. नैसर्गिक आणि कृत्रिमरीत्या साठलेल्या पाण्याच्या छोट्या-छोट्या जागांवर या डासांची पैदास होते. ते मुख्यतः दिवसा चावतात.


क्युलेक्स : भारतात याच्या २४० प्रजाती आढळतात. हे डास अंडी घालण्यासाठी व प्रजननासाठी स्थिर व अस्वच्छ खड्डे पसंत करतात. मुख्यतः रात्री चावतात. हे धोकादायक जपानी इन्सेफलायटिसचे मुख्य वाहक आहे.


मॅनसाेनिया : हा गट प्रामुख्याने उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळतो. भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण भारताच्या किनारपट्टी भागात आढळतात. त्यांचे पंख सपाट आणि रुंद आहेत. ते फायलेरिया पसरवतात.


पाच प्रमुख आजार : पहिला चिकुनगुण्या आहे, या आजाराने ग्रस्त व्यक्तीला तापासोबत तीव्र वेदना होतात. दुसरा मलेरिया आहे, यामुळे जगात दरवर्षी सुमारे साडेचार लाख मृत्यू होतात. त्याचप्रमाणे डेंग्यू, झिका आणि वेस्ट नाइल फीव्हरसारखे आजार डासांद्वारे पसरतात.


डॉ.(कर्नल) ज्योती कोतवाल
हिमेटोलॉजिस्ट, सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या