नवी मुंबई पोलिस दलातील नऊ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
नवी मुंबई
नवी मुंबई पोलीस दलात सोमवारी मृत पावलेल्यामध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल रामदास कोळी (55) व पोलीस हवालदार विनोद सुरेश पाटसकर (46) अशी या दोघा पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान,गत आठवडयांत तिन पोलीस कर्मचाऱयांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या दोघांचा मृत्यू झाल्याने नवी मुंबई पोलीस दलातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दोन पोलीस कर्मचाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने नवी मुंबई पोलीस दलातील मृत पोलिसांची संख्या नऊ झाली आहे.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल कोळी हे एनआरआय पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र करोनाशी झुंज देताना त्यांचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. तसेच पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले विनोद पाटसकर यांना बंदोबस्तावर असताना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर 7 सफ्टेबंर पासून डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र तीन दिवसापासून त्यांना श्वसानाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे नवी मुंबई पोलिसांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या