पूणे करार दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची राज्यभर निदर्शने

पूणे करार दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची राज्यभर निदर्शनेमुंबई
पूणे करार दिनाचे औचित्य साधून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे संस्थापक अध्यक्ष अॅड. . (डॉ.) सुरेश माने यांच्या आदेशानुसार कोवीड-१९ व लॉकडाऊनचे सर्व नियम यांचे पालन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना  निवेदन देण्यात आले. राज्यातील जनतेच्या कोविड-१९ बाबत समस्या, राज्यातील मागासवर्ग कर्मचारी यांचे प्रलंबित पदोन्नती याबाबत सरकारची भूमिका, विदर्भातील व महाराष्ट्रातील इतर भागातील पूरग्रस्तांना शासनाची त्वरीत मदत, राज्यसरकारव्दारा मुस्लिमांना आरक्षण, अनु जाती-जमाती यांच्यासाठी वार्षिक आर्थिक नियोजन, भटके विमुक्त यांची क्रमीलियरच्या जाचातून मुक्तता, अशा इतर महत्वपूर्ण विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदने  राष्ट्रपती-पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी व्दारा देण्यात येणार आहे व त्यानंतर हे निवेदन सर्व राष्ट्रीय व इतर पक्षप्रमुखांना देखील देण्यात येणार आहे.


मुंबई (कोकण विभाग) पूणे (पश्चिम-महाराष्ट्र) औरंगाबाद (मराठवाडा) धुळे (उत्तर महाराष्ट्र) व नागपूर (विदर्भ) या पाच- शहरात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती होती.  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीव्दारा राज्यभर गेले तीन महिने सतत राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिलदारमार्फत राज्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर केंद्र सरकारला निवेदने व राज्यातील महाआघाडी सरकारला स्मरणपत्रे सादर करण्यात आली आहेत.  ज्यामध्ये राज्यातील मागासवर्ग कर्मचारी पदोन्नती, लाईट बिले, विद्यार्थी समस्या, शहरातील एस.आर.ए. समस्या, ओबीसी जनगणना, भटके विमुक्ताची क्रेमीलियर मधून मुक्तता, मुस्लीम आरक्षण, एक कूटूब एक सरकारी नोकरी, आमदार-खासदारांना क्रेमीलियर लावून पेन्शन देणे वगेरे बाबींचा समावेश आहे. मात्र सरकार याकडे अद्यापही दुर्लक्ष करीत असल्याने त्यांना पुन्हा एकदा आठवण करण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे प्रा.चंद्रभान आझाद यांनी दिली. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे, पक्षसंस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. (डॉ.) सुरेश माने यांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडी घटक पक्ष आहे तरीसुध्दा राज्यातील जनतेप्रती पक्षाची बांधीलकी स्विकारून वांरवार केंद्र व राज्य सरकारचे लक्ष जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर वेधण्याकरिता ही निदर्शने करण्यात आली असल्याचे पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर जाधव म्हणाले.


 पुणे
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पश्चिम महाराष्ट्र च्या वतीने आज विधानभवन पुणे ह्या ठिकाणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.(डॉ.) सुरेश माने साहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन राज्यव्यापी विभागवार लक्षवेधी निदर्शने करण्यात आली तसेच देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्य निवडणूक आयुक्त व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी पुणे द्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी बापूराव लष्करे (महासचिव, महा. राज्य), धिरज बगाडे (अध्यक्ष, पुणे जिल्हा) जगन्नाथ सोनावले (महासचिव, सातारा जिल्हा)  जयंत चिंचोलीकर (अध्यक्ष, पुणे शहर)  किरण साळवे (प्रभारी, मावळ, मुळशी, खेड-आळंदी वि. सभा)  हर्षद डोक्र्स (अध्यक्ष, युवा आघाडी, पुणे शहर)  माधुरी खोब्रागडे (अध्यक्ष, महिला आघाडी, पुणे जिल्हा)  प्रतिभा नाखले (अध्यक्ष, महिला आघाडी, पुणे शहर)  जयंत जाधव (अध्यक्ष, शिरूर विधानसभा) नितीन सरोदे (अध्यक्ष, शि. नगर, वि. सभा)  सुरेश यादव (अध्यक्ष, वडगांव शेरी वि. सभा)  नेहा मुन्द्रे (अध्यक्ष, महिला आघाडी, वडगांव शेरी वि. सभा)  सोनल जाधव (अध्यक्ष, महिला आघाडी, शिरूर वि. सभा)  अभय शेलार (अध्यक्ष, युवा आघाडी, शि. नगर वि. सभा)  सनी शिंदे (अध्यक्ष, पुणे कॅन्टोन्मेंट वि. सभा)  संतोष भालेराव (अध्यक्ष, मावळ वि. सभा)


 

BRSP चे संविधान चौक नागपूर येथे लक्षवेधी निदर्शने 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA