Top Post Ad

म्हाडामार्फत होणार वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास, ५६७ सदनिका पोलिसांना राखीव

गृहनिर्माण मंत्र्यांनी वर्तक नगर पोलीस वसाहतीचा प्रश्न निकाली काढला
*म्हाडामार्फत होणार पोलीस वसाहतीचा पुन:र्विकास  *567 सदनिका पोलिसांना मिळणार


मुंबई 
 गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुन:र्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या वसाहतीचा पुन:र्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुमारे 567 घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून वितरीत करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न डॉ. आव्हाड यांनी तत्काळ मार्गी लावल्याने सबंध पोलीस दलातून आभार मानले जात आहेत. या प्रश्नावर आव्हाड यानी मंगळवारी गृहनिर्माण खात्याच्या वतीने तत्काळ एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, गृहनिर्माणचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.


1973 मध्ये म्हाडाने ठाणे पोलिस आयुक्तालयाला 856 सदनिका हस्तांतरित केल्या होत्या. परंतु त्यानंतर गेल्या 46 वर्षांमध्ये योग्य प्रकारे इमारतींची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या सर्व इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यापैकी काही इमारती अतिधोकादायक झाल्याने पाडण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित इमारतींमध्ये आजी-माजी पोलिसांची कुटुंब जीव मुठीत धरून जगत आहेत. काही पोलिस कुटुंबांना रेंटल हाऊसिंग योजनेत स्थलांतरित करण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात चार एफएसआय मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यापुढे कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या.  आव्हाड यांनी वर्तक नगरच्या पोलीस वसाहतीचे तत्काळ पुन:र्वसन करण्याचे आदेश दिले.  


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com