Top Post Ad

विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांना निवेदन

विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांना निवेदन


नवी मुंबई 
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना इंदिरा नगर परिसरातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्या सोडवण्यासाठीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या इंदिरा नगर-तुर्भे प्रभाग क्रमांक 73 च्या वतीने देण्यात आले. यात रस्ते दुरुस्ती,गटार दुरुस्ती,नियमित साफसफाई करणे,सार्वजनिक शौचालय बांधणे आणि प्रत्येक शौचालयास लागून मुतारी बांधणे, दिवाबत्ती दुरुस्ती,अर्धवट अवस्थेत ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या सोडून दिल्या आहेत त्या पूर्ण करणे आणि इतर समस्या  करणे जिवास धोकादायक असलेल्या विजवाहक तारा काढून त्या भूमिगत कराव्यात इत्यादी मागण्या 29 सप्टेंबर रोजी  देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.


इंदिरा नगर हा परिसर तुर्भे एमआयडीसी क्षेत्रात असलेली मोठी लोकसंख्या असलेली झोपडपट्टी क्षेत्र आहे. या ठिकाणी हातावर पोट असणारा मजूर वर्ग मोठया प्रमाणात वास्तव्यास आहे.आजतागायत येथील नागरी समस्या च्या बाबतीत प्रस्थापित सत्ताधारीनी आणि महानगरपालिका प्रशासनाने म्हणावे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरी सुविधा मिळण्यापासून वंचित असणाऱ्या इंदिरा नगर प्रभाग क्रमांक 73 च्या रहिवासी साठी आता वंचीत बहुजन आघाडी सरसावली आहे. वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मा.बेलापूर विधानसभा उमेदवार गौतम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बांगर यांची प्रत्यक्षात  भेट घेऊन इंदिरा नगर परिसरातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली.समस्या न सोडवल्यास अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी आघाडीचे इंदिरानगर प्रभाग क्रमांक 73 चे वॉर्ड अध्यक्ष सुनील गायकवाड, काशिनाथ पवार,दीपक गायकवाड, अमोल कांबळे,भाऊराव भालेराव,सुधाकर प्रशाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी चर्चेअंती  सदर नागरी समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1