प्रबुद्ध भारताकडे वाटचाल ....

2021 च्या जनगणने मध्ये बौद्ध लिखो अभियान !


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधम्माची दिक्षा देऊन 63 वर्ष होत आहेत. परंतु बौद्ध समाज हा अनुसुचित जाती जमातीच्या आवर्नातून बाहेर पडलेला नाही. कारण 2011 ला जी  जनगणना झाली तर त्यामध्ये 65 लाख लोकांनी ' बौद्ध ' म्हणून जनगणना केली व 80 लाख लोकांनी हिंदू ' महार ', म्हणून व जनगणना केली. हे बौद्ध धम्माचे लक्षन आहे का ? घरात बुद्ध व डॉ. बाबासाहेब फोटो ठेवायचे ठासून जयभीम म्हणायचे जनगणने मध्ये 80 लाख *लोकांनी हिंदू ' महार ' लिहून बाबासाहेबाचां विश्वास घात केला. सवलती साठी येवढं लाचार  झाले आहेत. अनुसूचित जातीच्या सवलती स्विकार करून पुन्हा ' महार ' या जातीतून बाहेर निघालात नाहीत ही शोकांतिका आहे. अस्पृश्यांना जातीच्या दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली  अशीच परिस्थिती कायम राहीली तर ' महारांनी ' बौद्धधर्म बुडविला असा कलंक अस्पृश्याच्या माथी पुन्हा लागणार नाही यांची काळजी घ्यावी डॉ. बाबासाहेबाच्या कार्यकतृत्वाने बौद्ध झालो आहोत.


धम्मदिक्षा अगोदर आपण अस्पृश्य असलो तरी मुळचे आपण बौद्ध आहोत हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ' द अनटचेबल्स ' या ग्रंथात सिद्ध केले आहे.बौद्धधम्माचा स्वीकार केल्यानंतर पत्रकारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्र्न विचारला
प्रश्न -  धर्मारानंत शेड्युल कास्ट फेडरेशनचे काय होणार ?
उत्तर- कदाचित तो कायम राहील किंवा नवा पक्ष स्थापन होईल मी मात्र बौद्धधम्मात प्रवेश केल्यानंतर शेड्युल कास्ट फेडरेशनचा सदस्य राहणार नाही.


प्रश्न- धर्मातरामुळे घटनेने अस्पृश्य वर्गाला ज्या खास सवलती दिल्या आहेत. त्याजातील त्या विषयी काय ? 
उत्तर- सर्वसामान्य नागरिकांना साठी सवलतीच्या तरतूदी केल्या आहेत त्या धर्मातरानंतर आम्हाला मिळतील पण सवलतीचा प्रश्न का उपस्थित करता ? त्याविषयी चिंता कशाला घटनेने दिलेल्या सवलतीचा लाभ उठविता यावा म्हणून आम्ही सदासर्वकाळ अस्पृश्य रिहावे ? आम्ही मनुष्यत्व गाठण्याचा प्रेयत्न करित आहोत. घटनेने दिलेल्या खास सवलती मिळाव्यात म्हणून ब्रम्हाण अस्पृश्य होतील काय ? या वृत्तपत्राचे लेखक माझ्या कडे गेली 40 वर्षांपासून हात धुवून पाठी लागले आहेत. हे सांगून बाबासाहेब म्हणाले की " आम्ही झगडतो आहोत ते इभ्रती करिता ! मनुष्य मात्राला पुर्ण अवस्थेलानेण्या करिता आम्ही तयारी करीत आहोत त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी आहे. या भाषणाचा विचार ज्या लोकांनी जनगणने मध्ये 80 लाख लोकांनी हिंदू  'महार ' लिहणाऱ्या लोकांनी करावा. जर  एक गोष्ट लक्षात घ्या 1935 नुसार अनुसूचित जातीच्या अंतर्गत सवलती मिळतात त्यावेळी आपण व बाबासाहेबांनी बौद्धधम्माची दिक्षा घेतली नव्हती म्हणून आपण 1956 पर्यंत अनुसूचित जातीच्या सवलती घेतल्या पण 14 ऑक्टोबर 1956 नंतर  बाबासाहेबांना हिंदू धर्माचा एक भाग किंवा पंथ म्हणून मिळालेल्या सवलती घेयच्या नव्हत्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून सांगितले आहे.


डॉ बाबासाहेबानी प्रतिज्ञा केली होती " मि हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही " बाबासाहेबानी ती प्रतिज्ञा पुर्ण केली. बौद्ध झाल्यानंतर त्यांनी ' शेड्युल कास्ट फेडरेशनचे सदस्यपद सुध्दा त्यागले परंतु त्याची जनता बौद्ध होऊन ही जवळपास 63 वर्षे झाले हिंदू ' महार ' म्हणून जगत आहे. यांचा विचार रात्री झोपताना हिंदू ' महार 'म्हणून जनगणना केली आहे त्यांनी करावा. 10 वर्षांनी जनगणना होते 2021 ला जनगणना होत आहे. बुद्धधम्माचे चक्र गतिमान करणे बौद्धाना अनुसूचित जाती जमाती मध्ये ठेवणे हिंदूत्ववाद्याचे षड्यंत्र हाणून पाडण्या संबंधी जनते मध्ये जनजागृतीचे काम 2019 मध्ये करणे आवश्यक आहे. येत्या जनगणने मध्ये बौद्धांची संख्या वाढावी लागेल त्यासाठी महाराष्ट्रा मध्ये जे दुसऱ्या राज्या मध्ये जागृत कार्यकर्त्यांनी सभा संमेलने घेऊन साहित्यिक व लेखक यांना बोलावून मार्गदर्शन करावे लोकांच्या मनातील म्हणजे 2011 ला ज्या 80 लाख लोकांनी हिंदू ' महार ' लिहिले आहे. त्याच्या मनातील भ्रम दूर करावा व ते बौद्ध म्हणुन आपली 2021 ला नोंद करतील. या कडे लक्ष्य देणे जरुरीचे आहे. प्रत्येक शहारा मध्ये जिल्हा , तालूका , गाव , वस्त्या मध्ये कार्यक्रम लावून समाजाचे प्रबोधन करणे जरुरीचे आहे. याने बौद्धाचे लोकसंख्या वाढेल प्रबुद्ध भारताकडे वाटचाल होईल . 


विकास शिंदे
26/9/20


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या