Top Post Ad

सोसायटीमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखणे बंधनकारक

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम १५ सप्टेंबरपासून काटेकोरपणे राबविणार


मुंबई
नागरिकांनी आपापसात किमान २ मीटरचे सुरक्षित अंतर ठेवणे. मास्कचा कटाक्षाने नियमितपणे व योग्य वापर. वारंवार हात स्वच्छ धुणे. सॅनिटायजरचा योग्य वापर करणे. रोज सकाळी शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी मोजून घ्यावे. मास्क काढून ठेवू नये. नाकाखाली/चेह-याखाली मास्क ठेवू नये. अशा नियमावलीची काटेकोरपणे पालन करण्याचे बंधन मुंबई महापालिकेने घातले आहे.  कोरोना साथीवर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत मुंबईकरांनी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. सार्वजनिक आयुष्यात या नियमांचे पालन करणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम १५ सप्टेंबरपासून महापालिका राबविणार आहे.


या मोहिमेंतर्गत पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक पालिका क्षेत्रातील प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांची ताप आणि प्राणवायू पातळी तपासणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, कोरोनाचे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे या बाबी राबविल्या जाणार आहेत. मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणा-या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचाही या मोहिमेत समावेश आहे. या मोहिमेत दोनवेळा स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. कुटुंब म्हणून आवश्यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्यांनी घ्यावी, कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेली पथ्ये पाळताना अनावधानाने चूक होत असल्यास ती एकमेकांच्या निदर्शनास आणून द्यावीत, हा यातील महत्त्वाचा भाग असणार आहे.


या नियमावलीत कोणाशीही बोलत असताना एकमेकांच्या चेह-यांकडे थेटपणे न बघणे. जेवताना एकाच भांड्यात किंवा पातेल्यात पदार्थ घेण्याऐवजी ते आवश्यकतेनुसार एकदाच ताटात घ्यावेत. जेवताना मौन ठेवावे किंवा कमीत कमी बोलावे. जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्त्व, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्त पदार्थ असावेत. त्याचबरोबर सोसायटीतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. सोसायटी/वसाहतीमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा. सोसायटींमधील प्रतीक्षागृहाचा शक्यतो उपयोग करू नये. सोसायटीत दरवाज्याचा कडीकोयंडा, कठडे, लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा ठिकाणी कुठेही हात लावणे शक्यतो टाळावे. लिफ्टचा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी कपट्यांचा उपयोग करावा. ते कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कच-याच्या डब्यात टाकावेत.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com