Top Post Ad

किती दिवस मुस्कटदाबी सोसणार

5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनाचा विरोध केलाच पाहिजे - यश भालेराव 


        खरेच प्रस्थापित व्यवस्थेने लादलेला त्याचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला पाहिजे का ? परंपरेनुसार एखाद्यानी आपल्याला काही सांगितले तर आपण त्या परंपरेच्या नावाने ते काम करतच असतो.."  अज्ञानी व्यक्ती या परंपरेच्या नावाखाली पारंपारिक काम करत असतात... पण शिकलेले व्यक्ती समतेच्या विचारांच्या महापुरुषांच्या विचारांचे  शिकलेले व्यक्ती, शिक्षक.,ते पण अज्ञानी अनपढ व्यक्तीसारखे करु लागले तर .,.,मग ते  तरी कोठे या शिक्षक दिनाचा सामुहिक पध्दतीने विरोध करतात . कि या बनावट शिक्षक दिनावर बहिष्कार टाकतात... महापुरुषांच्या विचारांचे शिक्षक    अजुन किती वर्षे ओझ्याखाली स्वतःला दाबून घेणार आहे.स्वतला फसवणार आहे... यातील बऱ्याच शिक्षकांना मनातुन वाटतय 5 सप्टेंबर राधाकृष्णनन यांचा जन्मदिवस आहे तो खरा शिक्षकदिन नाही .. पण त्याचा विरोध ते करत नाही..


      एकीकडे आपण उठबस फुले शाहु आंबेडकरांचे नाव घेतो. आणि त्याच वेळी त्याच्या विचारांना पुतळ्यात ,फोटोत अन स्मारकातच त्यांना बदिस्त करत असतो... समजु द्या ना लहानमोठ्या लाखो करोडो विध्यार्थांना आपल्या शिक्षणासाठी सर्वात आधी आणि शिक्षणाकरीता जे महात्मा फुले यांचे कार्य हे खुप मोठे आहे.. तेव्हा राधाकृष्णनन यांचा जन्म ही झाला नव्हता त्याच्या कितीतरी वर्षा आधी महात्मा फुलेंनी शिक्षणाची ज्योत पेटवली आहे,. शिक्षकांनो समजु द्या विध्यार्थांना शिक्षणासाठीचे खरे आणि खुप मोठे कार्य हे महात्मा फुलेचे आहे .. आणि हा बनावट शिक्षक दिन साजरा करण्यापेक्षा हा 5 सप्टेंबर चा बनावाट शिक्षकदिन आम्ही शिक्षकांपासून ते विध्यार्थांपर्यत शिक्षक दिन कोणीच साजरा करु नये ,


आणि 5 सप्टेंबरचा शिक्षकदिन समतेच्या विचारांच्या शिक्षकांवर बिंबवण्यासाठी आपल्या शिक्षकांना वेगवेगळ्या खाजगी  संस्था आणि सरकार हि पुरस्कार देत असतात.. अशा प्रकारे राधाकृष्णनन यांचा जन्मदिवसानिमित्तचे  शिक्षक दिनानिमित्तचे पुरस्कार आपण  स्वीकारु नयेत,ही अपेक्षा आणि विनती..
कारण देशातील पिढी हे  शिक्षकच घडवु शकतो",  शिक्षकालाच गुरु मानले जाते,, शिक्षकांना आदराचे स्थान असते
       मग शिक्षकांनी ही जबाबदारीने वागले पाहिजे,. सत्याला सत्य, असत्याला असत्य म्हटलेच पाहिजे ..,
आजही समतेच्या  विचारांचे लाखो शिक्षक आहे..  ते शिक्षक मनातुन हा शिक्षक दिन मानत नाहीत,. मग सार्वजनिक पध्दतीने हे शिक्षक 5 सप्टेंबर च्या शिक्षक दिनाचा विरोध का करत नाही..  या शिक्षक दिनावर बहिष्कार का टाकत नाही..
   किमान महाराष्ट्रातील शिक्षकांनी तरी अशा पध्दतीने सामुहिक भुमिका घेतलीच पाहिजे.., .. सरकारने 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन साजरा करायला सांगितला म्हणुन करायचा.. किती दिवस मुस्कटदाबी सोसणार आहे ..आणि भविष्यातील लाखो कोरोडो मुलांना ही हा बनावट शिक्षक दिन साजरा करायला सांगणार .,


 शिक्षकांनो  खरच शिक्षणासाठी राधाकृष्णनन याचे कार्य ईतके मोठे आहे का . ?
  राधाकृष्णनन यांनी खरच शिक्षणाकरीता खुप कष्ट घेतले आहे का ?
  राधाकृष्णनन यांनी शिक्षणाकरीता आणि शिक्षकाकरीता खुप मोठे कार्य केले आहे का.?
. ते आतापर्यत एकाही व्यक्तीने त्या प्रकारचे कार्य केले नाही.का ,,
 कि सर्वात आधी शिक्षणाकरीता आणि शिक्षकाकरीता  कार्य राधाकृष्णनन यांनी केले आहे,,
  शिक्षकांनो देश घडवण्याची ताकद ज्या शिक्षकांमध्ये आहे..
 तो शिक्षक मात्र  गप्प बसुन आहे.., सध्याचे काही शिक्षक मात्र या शिक्षक दिनाला विरोध करत नाही.. काही खाजगी शिक्षक ही विरोध करत नाही आणि सरकारी शिक्षक ही विरोध करत नाही... 
चालतय ना चालु दे आपल्याला काय करायच आहे..आपला  पगार येतोय ना मग कशाला विरोध करायचा कशाला कोणाच्या डोळ्यावर यायचे..


सध्या  आज घडीला किमान महाराष्ट्रात स्वतःला पुरोगामी म्हणणारया राजकीय पक्षांचे सरकार आहे. आणि या बरोबर पुरोगामी विचारांच्या आणि आंबेडकरी विचारांच्या मानणारया शिक्षणमंत्री ही आहे.. या शिक्षण मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना  सर्वानी सामुहिक रित्या सांगावे कि  5 सप्टेंबर  राधाकृष्णनन यांचा जन्मदिवस आम्ही शिक्षक दिन म्हणुन साजरा करणार नाही. आम्ही ज्यांनी शिक्षणाची सुरवात केली.. ज्यांनी शिक्षणाकरीता आहोरात्र कष्ट केले  त्या महात्मा फुले यांचा जन्मदिवस किंवा स्मृतीदिन आम्ही शिक्षक दिन म्हणुन साजरा करणार
 आणि किमान महाराष्ट्रातील पुरोगामी  सरकारने महाराष्ट्रात तरी महात्मा फुलेचा जन्मदिवस किंवा स्मृतीदिन  शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यासाठीचा जी आर काढावा...
 पण हे गेड्याच्या कातडीचे सरकार आपआपसात भांडणे लावणार..


 आपण एक मागणी केली कि महात्मा फुलेचा जन्मदिवस किंवा स्मृतीदिन शिक्षक दिन म्हणुन साजरा करावा..
 तर हे राजकीय नेते काहीं संस्था संघटनेला हाताशी धरुन बोलणार कि  सावित्रीमाईचा जन्मदिवस शिक्षकदिन तर काही जन बाबासाहेबांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणुन अशा वेगवेगळ्या  प्रकारच्या  मागण्या आपल्याला करायला लावतात.,
 मग काही संघटना त्या नुसार मागण्या करतात आणि आपल्यात फुट पाडण्यात हे राजकारणी यशस्वी होतात आणि मग कोणाची ही मागणी प्रबळ नसल्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस नाईलाजाने शिक्षण दिन साजरा करावा लागतो..
 आपल्या तील एकी नसल्यामुळे म्हणुन ..
"म्हणून तर आज ही आपण एक प्रकारचे गूलामीचेच जीवन जगत असल्यासारखे आहे.
 शिक्षकांनो तुम्ही सुरवात करा तुमच्या बरोबर आम्ही आहोतच .. तुमच्या ही पुढे एक पाऊल..
 पण आपल्याला न पटणारया विचारांना विरोध केलाच पाहिजे आपली एकमुखी मागणी महात्मा फुलेचा जन्मदिन किवा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणुन साजरा झालाच पाहिजे , ,.


विद्यमान शिक्षणमंत्री या आंबेडकरी विचारांच्या आहे. त्याच बरोबर सध्या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या राजकीय पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे शिक्षकांनी तर घाबरुच नये त्याचप्रमाणे इतर संस्था संघटनांनी ही प्रस्थापित व्यवस्थेचा शिक्षकदिन नकोच अशी मागणी केली पाहिजेच. केवळ महात्मा फुले यांचा जन्मदिन 11 एप्रिल हाच दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला पाहिजे ,,  काही अतिहुशार व्यक्ती 5 सप्टेंबरलाच शिक्षक दिन साजरा करतात किंवा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात, ते ही महात्मा फुले सावित्रीमाई फुले किंवा बाबासाहेब यांचा फोटो बरोबर शिक्षक दिनाच्या शुभेच्छाचे मँसेज पाठवत असतात, अशा सर्व ज्ञानी व्यक्तींनी एक  लक्षात घ्यावे 5 सप्टेंबरला कोणत्याही प्रकारचा कोणताच दिन साजरा करु नये.  पुढील प्रत्येक वर्षी शासनाने लादलेला हा शिक्षकदिन साजरा करु नका.,आणि विध्यार्थांनाही हा दिवस शिक्षक दिन साजरा करण्यास सांगु नका.


-यश भालेराव  (9067047333)
-----------------------------------


चोराच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे योग्य आहे का 


राधाकृष्णन यांनी एका तरुणाचा पीएच.डीचा प्रबंध स्वतःच्या नावावरती प्रकाशित केला, याविरुद्ध त्या तरुणाने राधाकृष्णन यांच्याविरोधात कलकत्ता न्यायालयात खटला दाखल केला होता. याबाबतचा सविस्तर वृत्तान्त जगविख्यात तत्ववेत्ता आचार्य रजनीश यांच्या ज्यूं मछली बिन निर या ग्रंथात सविस्तर दिलेला आहे. त्यामुळे चोराच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे हा शिक्षकांचा, शिक्षण क्षेत्राचा आणि आपल्या देशाचा अपमान आहे. त्यामुळे शिक्षणासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या महात्मा फुले यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे योग्य आहे. 


 महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी भारतात प्रथम सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला. ती तारीख आहे एक जानेवारी 1848.राधाकृष्ण यांचा जन्म आहे पाच सप्टेंबर 1888, म्हणजे राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर चाळीस वर्ष महात्मा फुले यांनी आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाला सुरुवात केली.राधाकृष्णन यांनी असे ऐतिहासिक कार्य केले नाही. महात्मा फुले हे भेदभाव न बाळगता सर्वांना शिक्षण देणारे महापुरुष होते. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. त्याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून केली. मुलांप्रमाणेच मुलींना शिक्षण दिले तरच समाजाची प्रगती होते., हा महात्मा फुले यांचा विचार होता.तो त्यांनी कृती करून दाखविला. राधाकृष्णन हे स्त्री शिक्षणाबाबत प्रतिकूल होते.त्यांची वृत्ती कशी होती हे त्यांचे पुत्र डॉ.गोपाल यांनी "राधाकृष्णन ए बायोग्राफी" या ग्रंथात लिहिले आहे.


                           महात्मा फुले यांचे साहित्य उस्फुर्त आहे. तृतीयरत्न,गुलामगिरी,शेतकऱयांचा आसूड,ब्राह्मणांचे कसब,शिवाजीचा पवाडा इत्यादी.त्यांच्या साहित्यातून आपल्या देशात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय क्रांती झाली. महात्मा फुले यांचे साहित्य वाचणारा माणूस जगात कोणाचाही गुलाम होऊ शकत नाही.इतके ते दिशादर्शक आहे.   राधाकृष्णन यांचे साहित्य सनातनी व्यवस्थेचे उदात्तीकरण करणारे आहे. हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ,  कॉमेंट्री ऑन भगवद्गीता, इथिक्स वेदांत, क्राईम ऑफ लीला हे राधाकृष्णन यांचे साहित्य आहे की जे ब्राह्मणी व्यवस्थेचे उदात्तीकरण करते. जनमाणसाचे दुःख, त्याची कारणे आणि त्यावरती उपाय योजना हे महात्मा फुले यांच्या साहित्याचे वैशिष्ट्ये आहे.


               


---डॉ.श्रीमंत कोकाटे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com