"सुपर संडे" माझी कला, चित्रकला स्पर्धा संपन्न
उरण
सद्यस्थिती पाहता प्राथमिक शिक्षण संस्था तसेच इतर शाळांमार्फत विविध प्रकारचे शैक्षणिक अभ्यास मुलांना देण्यात येतो.या सर्व अभ्यासाच्या दडपणामुळे मुले काही अंशतः अभ्यासाकडे पाठ फिरवत आहेत असे दिसून येत आहे म्हणून ही गळती रोखण्यासाठी मुलांना काहीतरी त्यांच्या आवडीचे पण अभ्यासा व्यतिरिक्त करायला द्यावे या उद्देशाने मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उरण तालुक्यातील गावात 'सुपर संडे माझी कला चित्रकला' हा उपक्रम घेण्यात येत आहे.यात प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
प्रथम शिक्षण संस्था आणि महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लॉक उरणच्या वतीने रणिता ठाकूर, तपस्या कडू ,मोहन पिंगळा यांच्या सहकार्याने सुपर संडे माझी कला चित्रकला ही संकल्पना राबविण्यात येत आहे. उरण तालुक्यातील मुलांसाठी मुलांची अभ्यासातील गोडी वाढविण्यासाठी आणि अभ्यासात सातत्य राहण्यासाठी मुलांकरीता एक आपापल्या आवडीचे चित्र काढावे त्यात त्यांना मोकळीक दिली की त्यांना जमेल तसे त्याच्याच आवडीचे चित्र काढायला सांगण्यात आले. या "सुपर संडे माझी कला चित्रकला"यात मुलांनी तर भाग घेतलाच पण मुलांच्या मातांनी पण भाग घेतला होता.बरेच पालक आम्हाला स्वतः फोन कॉल करून विचारात होते की आम्ही पण यात सहभागी होऊ का , त्यांना हो म्हटल्यावर त्यांनी आवडीने चित्र काढले आणि आमच्याकडे पाठवले.आज रविवार असून मुले आणि माता पालक आवडीने पेन्सिल पेन हातात घेऊन चित्र काढत होते.या उपक्रमास मुलांचा आणि पालकांचा यास चांगला प्रतिसाद मिळाला असे रणीता ठाकूर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या