खाजगी शाळेला मनसेचा दणका, फि मध्ये दिली सवलत

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा ग्रामिणच्या प्रयत्नांना यश. 
विद्यार्थ्यांच्या फी चे ( चाळीस लाख) 40,00,000 रु माफ.ठाणे
 पालकांची आर्थिक परिस्थिती,कोविड 19 सारखी महामारी यामुळे पालक वर्ग अक्षरशा वैतागला आहे. नोकरी नाही,काम नाही, पैसे नाही.या सर्व गोष्टींचा विचार करून शाळेने विद्यार्थ्यांची फी कमी करावी. याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी शाळेच्या मुख्यध्यापकाना भेटून चर्चा केली. मात्र शाळेनी याबाबत प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दिनांक १४ सप्टेंबरला शिष्टमंडळासह लेखी पत्र देऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पालकांच्या आर्थिक परिस्थितीच भान ठेवून डॉ ओमप्रकाश आग्रावाल इंग्लिश स्कुल नारपोली भिवंडी या शाळेने अखेर विद्यार्थ्यांना माहे जुलै व ऑगस्ट या महिन्यांची प्रत्येकी 1,000 रु फि कमी केली आहे. या प्रमाणे जवळपास विद्यार्थ्यांचे एकूण फी चे (चाळीस लाख) 40,00,000 रु माफ केले. अशी माहीती संतोष साळवी जिल्हा अध्यक्ष यांनी दिली. यावेळी शिष्टमंडळात सचिन पाटील शहर अध्यक्ष व योगेश धुळे शहर अध्यक्ष यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  संपुर्ण शिष्टमंडळाने डॉ ओमप्रकाश अग्रवाल इंग्लिश स्कुल चे मन:पुर्वक आभार मानले केले व 
आपल्या सारखा प्रगल्भ विचार सर्वच शाळा करतील हीच अपेक्षा व्यक्त केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या