वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत आमदार प्रताप सरनाईक यांची आयुक्तांशी चर्चा

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत आमदार प्रताप सरनाईक यांची आयुक्तांशी चर्चा


भाईंदर


मीरा भाईंदर मधील वाढती कोरोना रुग्णसंख्या तसेच परिवहन समस्या अशा प्रमुख समस्यांबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदरचे आयुक्त विजय राठोड यांची भेट घेतली. आणि सविस्तर चर्चा केली. मीरा भाईंदर शहरात कोरोना वाढत असतानाच कोविड रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शहरात महापालिकेने ताबडतोब आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवावी,  अशी मागणी सरनाईक यांनी केली.


मीरा भाईंदर शहरात कोरोना रुग्ण प्रमाण वाढत आहे. अनेक रुग्णांना ऐनवेळी ऑक्सिजन बेड , आयसीयू बेडची गरज लागते तर काहींना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. हे वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता महापालिकेने ताबडतोब आपल्या सुविधेत वाढ करावी , असे सरनाईक म्हणाले. त्यावर प्रभाग क्रमांक 12 मध्ये दीपक हॉस्पिटल शेजारी धर्माधिकारी हॉल मध्ये आणखी आयसीयू बेड तयार केले जाणार आहेत. याठिकाणी ऑक्सिजन बेड, 20 व्हेंटिलेटर बेड अशी सुविधा येत्या आठवड्यात तयार केली जाईल , असे आश्वासन आयुक्त राठोड यांनी आमदार सरनाईक यांना दिले.


मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा बंद पडली आहे त्यामुळे हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आज आमदार सरनाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना फोन करून परिवहनची समस्या सांगितली,  याचवेळी सरनाईक व आयुक्त राठोड यांनी फोनवरून परिवहनमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा महापालिकेनेच चालवावी. पालिकेची परिवहन सेवा चालू होत नाही तोपर्यंत भाईंदर ते उत्तन मार्गावर एसटी च्या बसेस चालू कराव्यात अशी विनंती आमदार सरनाईक यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांना केली. परिवहन मंत्र्यांनी ती तात्काळ मान्य केली. पुढच्या आठवड्यात भाईंदर उत्तन मार्गावर एसटी बसेस सुरू करण्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी आमदार सरनाईक यांना दिले आहे.  भाईंदर ते उत्तन मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी असून येथे एसटी बस सुरू झाल्यास प्रवाशांची सोय होऊ शकेल.  मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवा महापालिकेनेच चालवावी, असा आग्रह सरनाईक यांनी धरला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA