लॉजिस्टिक कंपन्यांकडून भिवंडी रोड स्टेशनवरील नवीन पार्सल व गुड्स शेडला उत्तम प्रतिसाद

 भिवंडी रोड स्टेशनवरील नवीन पार्सल व गुड्स शेड
लॉजिस्टिक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्रतिसाद


भिवंडी
भिवंडी पार्सल आणि गुड्स शेडने दि. १८.८.२०२० रोजी सुरू झाल्यापासून बिहारच्या दानापूर आणि पश्चिम बंगालमधील शालीमार येथे जाण्यासाठी दोन पार्सल गाड्या भरल्या.  घरगुती उपकरणे, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारख्या वापरल्या जाणा-या या वस्तूंची स्वस्त, सुरक्षित आणि जलद  वाहतूक करण्यासाठी शेडचा वापर करण्यास लॉजिस्टिक कंपन्या खूप उत्साही आहेत.   रेल्वे विभागातर्फे मुंबई विभागात उभारलेल्या व्यवसाय विकास युनिटच्या (BDU) माध्यमातून केलेल्या नवीन व्यवसाय उपक्रमांमुळे असा प्रतिसाद मिळत आहे.


१३ सप्टेंबर २०२० रोजी वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, इंडक्शन अप्लायन्सेस, मिक्सर ग्राइंडर इत्यादी गृहोपयोगी उपकरणे यासह ११५ टन /९६९२ पॅकेजेसनी भरलेला पार्सल ट्रेन  शालिमार एक्स्प्रेसला जोडून कोलकाता येथे जाण्यासाठी भिवंडी रोड स्थानकातून निघाली.  त्याआधी, नव्याने बनवलेल्या भिवंडी गुडशेडच्या पहिल्या प्रवासात ८६.८५ टन /३८७६ पॅकेजने भरलेली  दानापुरला निघालेली    पार्सल ट्रेन देवळाली येथे किसान रेल्वेला जोडण्यासाठी रवाना झाली.  श्री रोडवेज लिमिटेड, इंडियाचे संचालक श्री विकास गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे की, “मध्य रेल्वेबरोबर काम करणे नेहमीच आनंददायक असते.  भविष्यातही अशा अनेक पार्सल ट्रेन पाठविण्यात  भागीदारीची अपेक्षा आहे.”   मुंबई विभागाने स्थापित केलेल्या बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला परिणामकारक विपणनामुळे, बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आणि ई-कॉमर्स दिग्गजांना सेवा पुरवणा-या आणि  भिवंडी परिसरातील गोदाम असलेल्या लॉजिस्टिक कंपन्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.


 मुंबई आणि ठाणे यांच्या जवळच असलेले भिवंडीचे गुड्स शेड उत्तर व दक्षिण भारताला  रेल्वेशी आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट याच्याशी जोडलेले आहे.  ई-कॉमर्स कंपन्या आणि भिवंडीला जोडणारे चांगले  वाहतूक करण्यायोग्य रस्ते, ट्रक व टेम्पोसाठी पुरेशी पार्किंगची जागा, वस्तूंसाठी पुरेसे स्टॅकिंग क्षेत्र, ई-कॉमर्स कंपन्या, पावर लूम्स आणि मोठ्या कंपन्यांच्या  गोदामांसाठी हा एक मोलाचा फायदा असलेल्या  रणनीतिक ठिकाणी हे गुड्स शेड आहे.   सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय रेल्वे स्वस्त, सुरक्षित आणि जलद मालाच्या वाहतुकीची सुविधा देत आहे.  येत्या काही दिवसांत, व्यवसाय विकास युनिटद्वारे भिवंडी रोड येथील गुड्स शेडचा उपक्रम  केवळ रेल्वेसाठीच नाही तर सर्व एसएमई, एमएसएमई आणि इतर लॉजिस्टिक उद्योग, ई-कॉमर्स आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यांनाही लाभदायक सिद्ध  होईल.  अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क विभागाने १५ सप्टेंबर रोजी प्रसिद्धीपत्राद्वारे (प्रप क्रमांक 2020/09/26 ) दिली आहे.
 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA