स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शनपर ऑनलाईन करिअर गाईडन्स वेबिनार
मुंबई
सम्यक प्रयास फॉउंडेशन, मुंबई संस्थेमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगा द्वारा (MPSC) घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शनपर ऑनलाईन करिअर गाईडन्स वेबिनार घेण्यात आले. भविष्यात विद्यार्थ्यांना प्रशाकीय अधिकारी होण्यासाठी कोणती मूल्ये आणि गुण अंगीकारणे आवश्यक आहे, या बाबतीत संदीप कहाळे ( सहाय्यक पोलीस अधिकारी, पालघर) तसेच समाधान किरवले(कौशल्य विकास अधिकारी, बीड ) यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. 13 सप्टेंबर रोजी झालेल्या या वेबिनार मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यास संस्थेचे सभासद अक्षय रिकिबे, सत्यजित गायकवाड, प्रतिक थोरात, अपर्णा शिशुपाल, मुकेश वाकळे, रोहिणी खरात, बाळा आखाडे आणि विशाल पवार यांनी पुढाकार घेतला.यापुढेही संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक वेबिनारचे आयोजन करण्यात येणार असून आपण सर्वांनी यामध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन सम्यक प्रयास फॉउंडेशनचे प्रतिक थोरात- 7039240903 यांनी केले आहे.
0 टिप्पण्या