Top Post Ad

आग्र्यातील ताजमहाल पर्यटकांसाठी खुला मात्र महाराष्ट्रातील अजंठा वेरूळ लॉकडाऊन

आग्र्यातील ताजमहाल पर्यटकांसाठी खुला मात्र महाराष्ट्रातील अजंठा वेरूळ लॉकडाऊन


औरंगाबाद
कोरोना महामारी अद्यापही घोंघावत असली तरी आता संपूर्ण देश हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र  सरकारने आग्र्यातील ताजमहालाला उघडण्यास परवानगी दिली असून तो पर्यटकांसाठी २१ सप्टेंबरपासून खुला होणार आहे. मात्र देशातील अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळं अद्यापही बंद आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादजवळची जागतिक वारसा यादीतली अजिंठा आणि वेरूळच्या लेणी आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.  ताजमहालला उघडण्यास परवानगी दिली असताना इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना देखील परवानगी का देण्यात येत नाही, असा सवाल एका डिजिटल चर्चासत्रात "औरंगाबादमधील पर्यटन" या विषयावर पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांनी हा प्रश्न उपस्थित केला.


औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे (एटीडीएफ) नागरी विमान उड्डाण समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी या चर्चेदरम्यान प्रश्न विचारला की, पुरातत्त्व विभागाने आग्र्यातील ताजमहल उघडण्यास परवानगी दिली तर  औरंगाबाद मधील अजिंठा वेरूळला वेगळा न्याय का? त्याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून औरंगाबादमधील पर्यटन स्थळांचे प्रमोशन करण्याची मागणी देखील त्यांनी या चर्चासत्रादरम्यान केली. त्याचबरोबर सुरक्षेची काळजी घेऊन पर्यटकांना या ठिकाणी येऊ देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर सध्या विदेशी पर्यटक भारतात येणे शक्य नाही, मात्र स्थानिक पर्यटकांना आकर्षित करून या ठिकाणी येण्यासाठी प्रेरित करणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. तर ATDF अध्यक्ष जसवंत सिंग यांनी म्हटले की, विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध देशांबरोबर संपर्क साधने गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांनी देखील आपल्या पर्यटन स्थळाचे प्रमोशन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.  


औरंगाबादमधील हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसियनचे अध्यक्ष हरप्रीत सिंग यांनी म्हटले कि, सरकारची पोलिसी यामध्ये अडथळा ठरत असून हॉटेल आणि रेस्टॉरंटला याचा मोठा फटका बसत आहे. सध्या हॉटेल्स काही बंधनांसह उघडली आहेत. मात्र अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी हे पुरेसे नसल्याचे देखील त्यांनी म्हटले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील असिस्टंट प्रोफेसर बिना सेनगर यांनी म्हटले कि, या पर्यटन स्थळांचे पुनरुत्थान देखील गरजेचे आहे. या पर्यटन स्थळांची झालेली पडझड आणि स्वछता करणे देखील गरजेचे आहे. त्याचबरोबर औरंगाबाद हि महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असून महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे मुख्य कार्यालय देखील या ठिकाणी हलवण्याची मागणी जसवंत सिंग यांनी यावेळी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1