Top Post Ad

सब-ब्रोकर बनायचेय... मग या गोष्टी ठेवा लक्षात

सब-ब्रोकर बनायचेय... मग या गोष्टी ठेवा लक्षात


भारतात स्टॉक ट्रेडिंगचा सध्या ट्रेंड आहे. यात तुम्हाला प्रत्यक्ष सहभागी व्हायचे नाही. पण तरीही तुम्हाला त्याची मालकी हवी आहे. मग सब ब्रोकिंग हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. सब-ब्रोकर ही अशी व्यक्ती असते, जी बाजारातील सिक्युरिटीज खरेदी-विक्रीच्या व्यवहारात गुंतवणुकदारांना मदत करते. सब ब्रोकर हा स्टॉक एक्सचेंजमधील ट्रेडिंग सदस्य नसला तरीही, तो किंवा ती ग्राहकांना सेवा देण्यास स्टॉक ब्रोकरची मदत करतो.


तुम्ही सब-ब्रोकर होण्याचे ठरवले असेल तर,
तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील.
१.पात्रता: तुम्ही किमान १०+२ किंवा बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे. तथापि, काही ब्रोकर्स सब-ब्रोकरला नोकरीवर ठेवण्यापूर्वी किमान शिक्षण पदवीपर्यंत असेल, असे पाहतात. वित्तीय बाजाराच्या गरजांबद्दलचे तुमचे ज्ञान जास्त हवे. एखाद्या चांगल्या ब्रोकरकडे काम करण्याची पात्रता मिळवण्यासाठी काही परीक्षाही देता येतील. त्यात एनसीएफएम (एनएसई सर्टिफिकेशन इन फायनान्शिअल मार्केट), बीसीएसएम (बीएसई सर्टिफिकेशन ऑन सिक्युरिटीज मार्केट), एनआयएसएम कोर्सेस इत्यादींचा समावेश आहे.


२. कागदपत्रे: तुमची ब्रोकरची पात्रता पूर्ण होत असल्यास, तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यात काही ओळखपत्रे, उदा. पॅन कार्ड, आधार कार्ड आणि शिक्षणाचा दाखला (काही ब्रोकर्सना १०+२च्या शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र आवश्यक असते.) याशिवाय, तुमच्या घराचा व ऑफिसचा पत्ता पुरवा, तुमची छायाचित्रे, सी.ए. कडील रेफरन्स लेटर हे आवश्यक असेल. यासह आणखी काही गोष्टी आवश्यक असतील, त्या तपासा.


३. तुमची ब्रोकरेज फर्म चतुराईने निवडा: जी वस्तू कुणालाही खरेदी करायची नसते, ती कधीच विकू नये. त्यामुळे ब्रोकरेज फर्मवर चांगले संशओधन करा. गुंतवणुकदारांना कोणती फर्म अधिक आवडते हे पहा. तुमच्या ब्रोकरला चांगली ब्रँड इक्विटी आणि रिकॉल व्हॅल्यू असणे आवश्यक आहे. यामुळे नवे ग्राहक मिळवण्यास मदत होईल. सामान्यत: ज्या फ्लॅट फी स्ट्रक्चर शुल्क , मूल्य-वर्धित सेवा देणाऱ्या व स्पॉट-ऑन शिफारशी वाढवणाऱ्या फर्मला ग्राहक पसंती देतात.


४. आवश्यकता तपासून घ्या: एक सब-ब्रोकर होण्यासाठी, ठराविक अटी तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. एक सब ब्रोकर किंवा मास्टर फ्रँचायझी ओनर म्हणून तुम्हाला जवळपास २०० चौरस फुटांच्या ऑफिसची गरज आहे. ज्या ब्रोकरेज फर्मसोबत तुम्ही काम करणार आहात, त्यावर ही जागा अवलंबून आहे. तुम्हाला सुमारे १ ते २ लाखांपर्यंतचे रिफंडेबल डिपॉझिटही द्यावे लागेल. अखेरीस, तुमच्या ब्रोकरचे कमिशन स्ट्रक्चर तपासा. दरम्यान, सध्याच्या वर्क-फ्रॉम-होम स्थितीत व्यावसायिक जागेची गरज पर्यायी असू शकते.


५. रजिस्ट्रेशन फी आणि अकाउंट अॅक्टिव्हेशन: अखेरीस, तुम्हाला रजिस्ट्रेशन रक्कम जमा करावी लागेल. तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमच्या अकाउंटचा बिझनेस टॅग मिळेल. त्यानंतर तुम्ही व तुमच्या कर्मचाऱ्यांना ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, ग्राहक समर्थन आणि मार्केटिंग प्रणालीचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाईल, हे तुमच्या ब्रोकरवर अवलंबून असेल.


भारताची लोकसंख्या एक अब्जापेक्षा जास्त असूनही रिटेल सहभाग खूप कमी आहे. सध्या, शेअर बाजार हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग आहे. ते पारंपरिक गुंतवणूक उत्पादनांपेक्षा चांगले उत्पन्न मिळवून देतात. वाढत्या डिजिटलायझेशन आणि वाढत्या जागरूकतेमुळे, शेअर बाजारातील रिटेल सहभाग हा केवळ वरवरचा आहे. तो तळापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे सब ब्रोकरचा व्यवसाय करण्यासाठी ही संधी आहे.
(स्रोत: एंजेल ब्रोकिंग)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com