ठाण्याच्या मुख्य स्मशानभूमीत उंच चिमणी बसवण्यात आली

अखेर नागरिकांच्या प्रयत्नांना यश. 

जवाहरबाग जवळील मुख्य स्मशानभूमीत उंच चिमणी बसवण्यात आली


 

ठाणे

ठाणे येथील मुख्य स्मशानभूमीत प्रेत जाळतांना निघणारे धूर आणि दुर्गंधी मुळे खारटण रोड परिसरातील नागरिकांना गेले सहा महिने अतिशय त्रासदायक परिस्थितीला तोंड द्यावे लागते आहे. युवक कॉंग्रेस चे विभाग अध्यक्ष प्रविण खैरालिया यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. व त्या नंतर  इम्पिरियल हाईट सोसायटी, डॉ आंबेडकर गृहनिर्माण सोसायटी, बाल्मीकि विकास संघ, कल्पतरू मित्र मंडल आदी विविध संस्था संघटनांच्या वतीने देखील तक्रार करण्यात आली होती. तसेच जाग,ठाणे व जन आंदोलनांचाराष्ट्रीय समन्वयाचे नेते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता जगदीश खैरालिया यांच्या नेतृत्वाखाली खारटण रोड परिसरातील शेकडो जागरुक नागरिकांनी एकत्रित येवून ठाणे महापालिका प्रशासनाला जाब विचारत आंदोलनांचा इशारा दिला होता. ज्येष्ठ आर टी आय कार्यकर्ते राजीव दत्ता व व्यसन मूक्ती अभियानचे संजय धिंगाण यांनी देखील या प्रकरणी पाठपुरावा केला होता. 

 

पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य  प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे महापालिका आयुक्त यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्या मुळे शेवटी आता स्मशानभूमीतील धूर व दुर्गंधी पासून नागरिकांना आता सुटका मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य रक्षणासाठी व पर्यावरण रक्षणासाठी विविध प्रसिद्धी माध्यमातून योग्य प्रसिद्धी मिळाल्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाला दखल घेणे भाग पडले. उशिरा का होईना न्याय मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करणारे परिसरातील नागरिक,  विवीध संस्था- संघटना यांनी एकजूट दाखवल्या बदल प्रविण खैरालिया यांनी एका पत्रकाद्वारे  सर्वांचे आभार मानले आणि ठाणे महापालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या