Top Post Ad

चेन्नई सुपर किंग्जने ट्रेलसोबत लाँच केले सीएसके मिलियन अँथम

चेन्नई सुपर किंग्जने ट्रेलसोबत लाँच केले सीएसके मिलियन अँथम


मुंबई
 ट्रेल या लाइफस्टाइल व्हिडिओ अॅपने २४ सप्टेंबर रोजी अॅपवर चेन्नई सुपर किंगच्या सहकार्याने सीएसके मिलियन अँथम (#CSKMillionAnthem) लाँच केले. लाइफस्टाइल व्हिडिओ स्पेसमधील ही भारतातील सर्वात मोठी स्पर्धा असून यूझर्स एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ येथे पाहू शकतात, त्यांच्या टीमसाठी चीअरिंग करू शकतात. तसेच ट्रेलवरील एक्सक्लुझिव्ह ऑफरवर खरेदीही करू शकतात. यासोबतच, त्यांच्या आवडत्या सीएसके टीम प्लेअर्सना व्हर्चुअली भेटण्याची संधीही मिळू शकते. यूझर्सना ३५ कोटी रुपयांचे भव्य बक्षीस मिळण्याचीही संधी आहे. लाखो उत्साही चाहत्यांना या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यासाठी एकत्र आणत एक जगातिक विक्रम करण्याचा उद्देश यामागे आहे. ट्रेलने नुकतीच चेन्नई सुपरकिंग्ल सोबत डिजिटल पार्टनरशिपची घोषणा केली असून याद्वारे त्यांचे न पाहिलेले कंटेंट, फॅन-फेव्हरेट प्लेअर व्हिडिओ, प्लेअर्सचे मॅसेज आणि सीएसकेच्या @chennaiipl हँडलरवर पडद्यामागील क्षण दर्शवण्याचे विशेष हक्क प्लॅटफॉर्मला मिळतील.


या कँपेनमुळे प्लॅटफॉर्मवर प्रचंड वृद्धी झाली असून एकाच दिवसात १ लाखांपेक्षा जास्त व्हिडिओ तयार करण्यात आले. अॅपवरील सद्यस्थिती पाहता, यूझर्स आधीपासूनच सीएसके टीमसाठी चिअरिंग करत आहेत. बेनी दयाल यांनी गायलेल्या नव्या व्हायरल अँथमवर डान्स करत आहेत. यातील हुक स्टेप डान्सफिट लाइव्ह या लोकप्रिय डान्स ट्रुपने तयार केली आहे. फायनल अँथम नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार असून त्यात अॅपमधील सर्व सहभागींचा समावेश असेल. अशा प्रकारे हे यूझर्सनी तयार केलेले भारतातील सर्वात मोठे अँथम असेल. या कँपेनद्वारे, स्टेडियम ऑफलाइन असतानाही ऑनलाइन उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न ट्रेलद्वारे केला जात आहे. तसेच यूझर्स या प्लॅटफॉर्मवर कथाकथनाच्या कौशल्याद्वारे ऑनलाइन कम्युनिटीजमध्ये क्रिकेटविषयीचा उत्साह साजरा करतात.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com