लोकमित्र ट्रस्टचा ''बालनगरी''  स्तुत्य उपक्रम

लोकमित्र ट्रस्टचा ''बालनगरी''  स्तुत्य उपक्रम

 


देशात बालशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या, बालवाडीसह विविध प्रयोग करणा-या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या स्मुर्तीदिनाचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करत  लोकमित्र ट्रस्टच्या माध्यमातून "बालनगरी" या कार्यक्रमाला  सुरवात करण्यात आली आहे. यावेळी  धनगरवाडी,मेंढला यवतमाळ येथे  या कार्यक्रमाची  सुरवात करण्यात आली आहे.         आज वस्तीतील मुलांना एकत्रित करून गाणी ,गोष्टी, आकार आणि रंगानुसार पानं वेगळी करणं हे उपक्रम प्रकल्प संचालक धम्मानंद बोंदाडे आणि  प्रणाली जाधव यांनी घेऊन समाजिक जबाबदारी पार पाडली आहे. 

 

.मुलांच्या भावविश्वात मोठयांनी एकरूप होऊन हसत खेळत शिकण्यासाठीचा नवा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला. मुलांचं शिक्षण  हे नैसर्गिकरित्या होतं असतं ,पण त्यासाठी मुलांना शिकण्यासाठी अनुरूप वातावरणाची आणि सहकार्याची ही तितकीच गरज असते .लॉकडाऊन मुळे शाळा आणि अंगणवाडी बंद असल्याने हे शिकणं थांबू नये यादृष्टीने केलेली ही वाटचालच म्हणावी लागेल.  ''ओवी पालकत्वाची'' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपासून एकदिवस आड ही ''बालनगरी'' भरणार असून असे अनेक शैक्षणिक उपक्रम मुलांसोबत कायमस्वरूपी घेण्याचा लोकमित्र ट्रस्ट ने निश्चय केला आहे. 

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या