हजारो किराणा दुकाने आणि लघु व मध्यम उद्योगांचे डिजिटल व्यासपीठ

हजारो किराणा दुकाने आणि लघु व मध्यम उद्योगांचे डिजिटल व्यासपीठ

 

ठाणे:
कोविड 19 काळात लॉकडाऊन दरम्यान अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. या आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक उद्योगधंदे तसेच हजारो किराणा दुकाने आणि लघु व मध्यम उद्योगांना सावरण्यासाठी बराच कालावधी लागणार असण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमिवर फ्लिपकार्ट तर्फे हजारो किराणा दुकाने आणि लघु व मध्यम उद्योगांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होणार असून 12 नवीन शहरांमध्ये या सेवेचा विस्तार होणार आहे अशी माहिती फ्लिपकार्ट होलसेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन यांनी दिली. 

 

उत्सवी हंगाम उंबरठ्यावर येऊन ठेपलेला असताना फ्लिपकार्ट होलसेल आता गाझियाबाद, फरिदाबाद, म्हैसूर, चंदिगड ट्रायसिटी, मेरठ, आग्रा, जयपूर, ठाणे-भिवंडी-उल्हासनगर, बृहन्मुंबई, वसई-विरार-मिरा-भाइंदर, ठाणे (कल्याण डोंबिवली) आणि ठाणे (नवी मुंबई) येथे उद्योगांना सेवा सुरू करणार आहे. या माध्यमातून आपल्या मालाची  किरकोळ विक्री करणार्‍या वर्गाला एकाच व्यासपीठावरून संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे लघु उद्योगांना विविध प्रकारची उत्पादने वाजवी किमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. या शहरांमध्ये फॅशनसह विस्तारीकरण करण्यात येणार असून फ्लिपकार्ट होलसेल हे किराणा दुकाने आणि सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योजक डिजिटल परिवर्तन घडवून त्यांना वेगाने प्रगती करण्यास, ग्राहकांना बांधून ठेवण्यास आणि त्यांची नफा मिळविण्याची क्षमता वाढविण्यास मदत करणार आहे.

 

फ्लिपकार्ट होलसेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन म्हणाले, “उत्सवांचा हंगाम सुरू होत असताना आम्ही १२ शहरांमध्ये विस्तारीकरण करताना अत्यंत उत्साहात आहोत. एमएसएमई आणि किराणा दुकानांसाठी अधिक संधी तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ट्रेंडी जयपूरी कुर्तींपासून ते म्हैसूर सिल्क साड्यांपर्यंत, छोट्या उद्योगांनी डिजिटल परिवर्तन स्वीकारावे आणि अधिक भक्कम व्यवसायरूप घडवावे यासाठी त्यांची मदत करणे हा आमचा हेतू आहे. आमच्या उपक्रमामुळे देण्यात येणाऱ्या योगदानामुळे होणारी एमएसएमई आणि किराणा दुकानांची भरभराट पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि या माध्यमातून भारतात लाखो नव्या व रोमांचक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.”

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA