Top Post Ad

आयुक्तांच्या आदेशानंतर महापालिकेने केली सातनंतर उघड्या दुकानांवर धडक कारवाई

स्वच्छतेबाबत सहाय्यक आयुक्तांनी सतर्क राहावे
महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांचा इशारा
दोन दिवसांनतर प्रभागामध्ये अचानक पाहणी करणार


ठाणे
शहरातील स्वच्छता माझ्यासाठी अतिशय महत्वाचा विषय असून सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबत सतर्क राहण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज सहाय्यक आयुक्तांच्या बैठकीत दिला. दरम्यान दोन तीन दिवसानंतर कोणत्याही प्रभागाचा पाहणी दौरा करून स्वच्छता कशी आहे याची पाहणी करणार असल्याचे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. २८ सप्टेंबर रोजी सकाळी महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी अचानक दोन-तीन प्रभाग समितीची पाहणी करून काही ठिकाणच्या कचऱ्याबाबत असमाधान व्यक्त करून आज सायंकाळी तातडीने सर्व सहाय्यक आयुक्तांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महापालिका आयुक्त डॅा. शर्मा यांनी स्वच्छतेबाबत कुठलीही सबब ऐकूण घेतली जाणार नाही असे सांगून सर्व सहाय्यक आयुक्तांनी येत्या तीन दिवसांत आपला प्रभाग स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी असे सांगितले.


महापालिकेचे विविध कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत ठेवू नका. त्यांना मदत करा अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या. ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर धनादेशद्वारे भरायचा आहे त्यांच्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत उद्या सायंकाळपर्यंत चेक ड्रॅाप बॅाक्स बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा मालमत्ता कराच्या देयकाची झेरॅाक्स कॅापी, आपले नाव, संपर्क क्रमांक, ग्राहक क्रमांक आदी तपशीलासह आपला चेक ड्रॅाप बॅाक्समध्ये टाकल्यास दुसऱ्या दिवशी त्यांना त्याची पावती देण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.


मास्क वापराची सक्ती करा- सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभाग समितीतंर्गत नागरिकांनी मास्कचा वापुर करावा यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करावी तसेच नागरिकांनी मास्कचा वापर करण्याची सक्ती करावी. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले आहे.
या बैठकीला परिमंडळ उपायुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.


सातनंतर सुरू राहणाऱ्या दुकांनांवर कारवाई करा- राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सायंकाळी सातपर्यत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. महापालिकेनही तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. तरीही काही आस्थापना सात नंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे सातनंतर ज्या आस्थापना उघड्या आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत सर्व सहाय्यक आयुक्तांनी रोज सायंकाळी सात ते साडे सात या कालावधीत आपल्या प्रभागामध्ये फिरून सात नंतर सुरू असणाऱ्या तसेच ज्या ठिकाणी गर्दी होते अशा आस्थापना, अन्न पदार्थाचे स्टॅाल्सवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.


 


सातनंतर उघड्या आस्थापनांवर महापालिकेची धडक कारवाई
आयुक्तांच्या आदेशानंतर सहा. आयुक्तांची कारवाई
 सातनंतर उघड्या राहणा-या आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर आज सायंकाळी सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीमध्ये धडक कारवाई केली.  सायंकाळी सातनंतर अनेक आस्थापना सुरू असल्याच्या तक्रारी तसेच काही ठिकाणी अन्न पदार्थांचे स्टाॅलवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आज सायंकाळच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना प्रभागामध्ये फिरण्याच्या सूचना दिल्या होत्या.   त्यानुसार सर्व आयुक्तांनी आज आपापल्या प्रभागामध्ये फिरून सातनंतर उघडी असलेली दुकाने सील करण्याची धडक कारवाई केली. 



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com