Top Post Ad

नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारचा निधी मंजूर

नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारचा निधी मंजूर:
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांची वचनपूर्ती


मुंबई /नागपूर,
नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये ३०-३१ ऑगस्ट तसेच १ सप्टेंबर २०२० रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरिस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तरी,नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना विविध बाबींसाठी वाढीव दराने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून नागपूर विभागातील पूरग्रस्त जिल्ह्यासाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे.अशाप्रकारे पुरग्रस्थाना भरीव मदत करून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी वचनपूर्ती केली आहे.


 मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदीखुर्द प्रकल्पातील सर्व दरवाज्यांमधून ५ मीटर पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला.यामुळे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात १९९५ साली ओढावलेल्या पूरापेक्षाही मोठ्या प्रमाणात पूर पपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांत, शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या दाहक व भीषण परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून  नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीने चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व नागपूर जिल्ह्याचा दौरा केला.


या चारही जिल्हयातील  पूरग्रस्त भागाची पाहणी करताना  वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाविकास आघाडी सरकार  पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन  दिले होते.  दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून पुरग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती.या अनुषंगाने आजच महसूल व वन विभागाने निधी मंजूरीचा शासन निर्णय निर्गमीत केला. 


नागपूर विभागातील ६ जिल्हयातील मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज शेतीसाठी सहाय्य व मदत, मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णता: घराची क्षती झाली असल्यास कपडे, भांडी व घरगुती वस्तूंकरीता, शेतपिकांच्या नुकसान, मृत जनावर, व घराची अंशता: पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरं, नष्ट झालेल्या झोपड्या आणि गोठ्याचे नुकसान, कारागीर, बारबलुतेदार, दुकानदार व टपरी धारकांना मदत, जमिनीतील वाळू, चिकन माती क्षार काढून टाकण्यासाठी शेतकर्याना सहायय तसेच नदीच्या रूपांतरामुळे झालेले जमिनीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सहाय्य, मोफत केरोसीन वाटपासाठी साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १६२ कोटी ८१ लाख ७ हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागपूर जिल्हयासाठी  ४५कोटी १७ लाख  ७९ हजार , वर्धा ६९ लाख , भंडारा ४ हजार २४३ लाख  ५३ हजार, गोंदीया १ हजार २३२ लाख  ४०हजार , चंद्रपूर ३हजार ७८१ लाख ६ हजार  व गडचिरोली जिल्हयासाठी २ हजार ४३७लाख  २९ हजार  रूपये निधी मंजूर झाला आहे. नागपूर दौऱ्यावर असतांना दिलेला शब्द वडेट्टीवार यांनी शासन निर्णय निर्गमित करून पूर्ण केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com