Top Post Ad

कल्याण-ठाणे दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गीकेचे काम अंतिम टप्प्यात




पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात
मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार


कल्याण
कल्याण-ठाणे दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम येत्या मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे.  या रेल्वे मार्गीकेचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. मात्र त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी होत्या. डिझाईन बदलावे लागले होते. सीआरङोडच्या जागेचा प्रश्न होता. या अडचणी दूर करण्यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमधून या अडचणीवर मात करुन या दोन्ही मार्गिका आता प्रत्यक्षात येत आहेत. या मार्गिके दरम्यान ३१ लहान आकाराचे व ३ मोठया आकाराचे ब्रीज होते. त्यांचे काम झालेले आहे.


विशेष म्हणजे  या मार्गात १७० मीटर लांबीचा बोगदा होता. हा बोगदा तयार आहे. मुंब्रा व कळवा स्थानकातील रेल्वेची सव्र्हीस रुमचे बांधून तयार आहे. १९ किलोमीटर मार्गापैकी १५ किलोमीटरचा रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण झालेले आहे. केवळ चार किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे काम बाकी आहे. कोरोना काळात या कामाला अडथळा निर्माण झाला होता. आत्ता अनलॉकमध्ये पुन्हा या कामाला सुरुवात केली आहे. दिवा येथील पादचारी पूलाचे काम सुरु आहे. ते देखील लवकर मार्गी लावले जाईल. त्यामुळे पाचवी व सहावी मार्गिका रेल्वे गाडय़ांसाठी मार्च २०२१ रोजी खुली होणार आहे.  जलद व धीम्या मार्गाकरीता प्रत्येकी दोन या प्रमाणो चार रेल्वे मार्गिका मुंबई ते कल्याण दरम्यान आहेत. दिवा हे जंक्शन आहे. तसेच कल्याण जंक्शन आहे. या मार्गिकेवर मालवाहतूक करणा:या मालगाडय़ांच्या वाहतूकीचा ताण आहे. पाचवी व सहावी मार्गिका कार्यान्वीत झाल्यावर मालगाडय़ांचा ताण कमी होऊन. उपनगरीय वाहतूकीवर मालगाडय़ांचा ताण ठाणे ते कल्याण या दरम्यान येणार नाही, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.



 



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1