महाराष्ट्राची विस्कटलेली आर्थिक घडी,पुर्ववत करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी मांडला आराखडा...!!
--------------------------------------------
आज ABP माझा या टि.व्ही. चॅनलला पत्रकार नम्रता यांना मुलाखत देतांना वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रातील विस्कटलेली आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी आराखडा दिला आहे...!!
अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी एक महत्त्वाची अपेक्षा अशी व्यक्त केली आहे की, येणाऱ्या काळात कोरोना पुन्हा आक्राळ विक्राळ रूप धारण करणार आहे " ही भीती" घालविणे शासनाने आणि मिडियाने थांबविले पाहिजे...!!
महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची पुनर्बांधणी करण्यासाठी खालील चार उपाय वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेत...!!
१) महाराष्ट्रातील मंदिरे खुले करुन धर्माच्या भोवती जी आर्थिक उलाढाल होते ती सुरु केली पाहिजे जेणेकरून आर्थिक देवाण-घेवाण सुरू होईल आणि १ लाख कोटींचा महसूल महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत जमा होईल...!!
२) अलूतेदार,बलूतेदार घटक जे कलेक्टर कडे नोंदणीकृत आहेत त्यांना किमान २५ हजार रुपये लोन देऊन त्यांचं ऊत्पादन सुरू होईल अशी तरतूद करावी,ते सर्वच स्वयं ऊत्पादक घटक आहेत, त्यामुळे त्यांना जगवायची गरज नाही तर ते इतरांसाठी रोजगार उपलब्ध करु शकतात हा घटक महाराष्ट्रात किमान ८० लाख आहे...!!
त्याच बरोबर महाराष्ट्रातील कोळी भोई किंवा धीवर हे मत्समारी करणारे महाराष्ट्रात किमान १६ लाख आहेत त्यांना जर मासेमारी करण्यासाठी तलाव दिले तर ते इतर दहा लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात...!!
३) शेतकऱ्यांचा शेतमाल शासनाने स्वत:खरेदी करावा त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी-विक्री केंद्र सरकारने ताब्यात घ्यावे आणि तो माल बाजारात विकावा म्हणजेच व्यापारी कमावत असलेला नफा सरकारला आपली आर्थिक घडी दुरुस्त करण्याच्या कामी येईल.त्यातुनही मोठ्या प्रमाणावर महसूल ऊभा राहीलं...!!
४) मनरेगाचा पैसा हा राज्य शासनाचा पैसा आहे, केंद्र शासनाचा नाही, म्हणून राज्य शासनाने मनरेगाची कामे सुरू करुन अर्थचक्र फिरवले पाहिजे जेणेकरून मजुरांना काम मिळेल आणि त्यांच्या श्रमातुन राज्य सरकारला आर्थिक स्त्रोत ऊभा करता येईल...!!
वरील चार पर्याय बाळासाहेब आंबेडकर यांनी सरकारपुढे ठेवले आहेत , महाराष्ट्राचे सरकार काय निर्णय घेते ते पाहणे तेवढेच आपल्या हातात आहे...!!
वरील चारही पर्याय हे महाराष्ट्रातील तमाम गरीब तथा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित आहेत एवढे मात्र खरे...!!
जयभीम.
0 टिप्पण्या