माझे कुटुंब माझी जबाबदारी, मोहिमेला टिटवाळ्यात सुरवात
टिटवाळा
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेला टिटवाळात सुरवात झाली असून,हि मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश कं, डो, म, पालिकेने त्या, त्या, आरोग्य विभागाला दिले आहे। त्याअंतर्गत हि मोहीम यशस्वीरित्या राबवण्यासाठी मांडा टिटवाळ्यातील आरोग्य विभाग,आरोग्य कमँचारी डॉ तृणाली महातेकर, रविराज गायकवाड, सौ सुवणाँ चौधरी, सौ मिरा हणमंते, सौ माया गडसे आदि कमँचारी आणि आरोग्य अधिकारी यांनी पुढाकार घेऊन मोहिमेला यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे.
कोवीड वर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येणार असून या मोहिमेत संशयास्पद कोवीड तपासणी व रुग्णांना उपचार, अति जोखीमेचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोवीड १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण रुग्णांचे ग्रृहभेटिदृवारे संरक्षण, कोवीड तपासणी, आदि प्रमुख उद्दिष्टे या योजनेत असणार आहेत। या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन कुटुंबांचे सवँक्षण करण्यात येणार आहे। या साठी आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। हि मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नागरिकांचा सहभाग व प्रतिसाद महत्त्वाचा असून, नागरिकांनी कुटुंबाची निःसंकोचपणे माहिती देणे आवश्यक आहे। या मोहिमेअंतर्गत कोवीड वर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाला तपासणीसाठी साह्य करणे गरजेचे आहे, असे आवाहन मांडा टिटवाळ्यातील आरोग्य विभागाने व्यक्त केले
0 टिप्पण्या