Top Post Ad

गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं

महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. गेल्या आठवड्यात याची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायाधीशांनी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून त्याची पुढील सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठा (बेंच) कडे दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला तात्पुरती का होईना स्थगिती मिळाल्याने मराठा समाजात नाराजीचे वातावरण आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राजकारण केले जात असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 

------------------------

राज्य शासनाने २५०० पानांचे मराठा आरक्षण प्रतिज्ञा पत्र माननीय उच्च न्यायालयात दाखल केले असून त्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी भाषणाचे संदर्भ दिलेले आहेत. त्यात त्यांनी बाबासाहेबांच्या नागपूर धम्मक्रांतीवर आधारित असलेली भाषणं, 'शुद्र पुर्वी कोण होते? या ग्रंथातील संदर्भ,महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या काही खंडातील संदर्भ दिलेत.तसेच बाबासाहेबांचा सध्याच्या परिस्थितीत अतिशय प्रासंगिक असणारा विचार संदर्भ म्हणून दिलाय.तो असा "लिंगायत, मुसलमान, मराठे व अशपृश्य ही सर्व मागासलेले आहेत.या समदुखी माणसांनी एकत्र येऊन ऐकमेकास सहकार्य करावे ? बाबासाहेबांच्या या विचारांचा स्पष्टपणे उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. मराठा समाज हा शुद्र होता व तो आर्थिक सामाजिकरित्या मागासलेला आहे.अशाप्रकारचे संदर्भ देण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने का होईना पण मराठा समाज येथील सामाजिक रचनेनुसार शुद्र आहे ही गोष्ट पुढे आली.हा इतिहास बहुतांश इतिहासकारांना माहिती आहे. परंतु बहुतांश मराठा बांधवांना वाटतं की,आम्ही मागासवर्गीय नाहीत तर उच्चवर्णीय आहोत.त्यांच्या याच मानसिकतेमुळे त्यांना आजपर्यंत आरक्षणापासून वंचित राहावे लागतेय.आजही काही लोक तीच चुक करतात.परंतु आरक्षण मिळावे असं वाटत असेल तर कोर्टात सामाजिक मागासलेपण सिद्ध करून दाखवावेच लागेल.त्याशिवाय अन्य पर्याय नाही.

आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या राजकीय पक्षात मराठा समाजाची आमदार खासदार आहेत. ही जनतेचीच प्रतिनिधी असतात. परंतु हीच लोक जनतेचं किती काम करतात हे मराठा बांधवांने समजून घ्यायला हवे. ही नावालाच जनतेची प्रतिनिधी आहेत. परंतु वास्तविक पाहता ते आपापल्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणूनच काम पाहतात.सामान्य मराठा बांधवांना वाटतं आमची लोक फार मोठ्या प्रमाणात विधानसभा,लोकसभेत आहेत.परंतु बहुतांश लोकप्रतिनिधी ही केवळ नावालाच आहेत. त्यांच्याकडे केवळ पोझिशन आहे पावर नाही. या गोष्टीचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला पाहिजे. तसेच केवळ आरक्षण मिळावे म्हणून बाबासाहेबांच्या विचाराचे संदर्भ दिले ही गोष्ट चांगलीच आहे. परंतु बाबासाहेबांच्या इतरही विचारांची मराठा बांधवांना नितांत गरज आहे.मराठा समाजाने बाबासाहेब म.गांधी यांच्यात झालेला 'पुणे करार' व भारतीय संविधान प्रथमतः वाचावे.तसेच बाबासाहेबांचे इतिहासावर आधारित असलेले ग्रंथ वाचावेत.

Adv K T Chaware -  मुंबई उच्च न्यायालय









 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com