Top Post Ad

अखेर ठाण्यातील अतिधोकादायक पत्रकार भवनवर ठामपाची कारवाई

अखेर ठाण्यातील अतिधोकादायक पत्रकार भवनवर ठामपाची कारवाई

ठाणे : (आबासाहेब चासकर)


सन्  2015 पासून अतिधोकादायक झालेल्या ठाण्यातील पत्रकार भवनची इमारत ठाणे महापालिकेने पाडून टाकावी यासाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाने सातत्याने पत्रव्यवहार केला. अखेर त्याला यश मिळाले असून 10 सप्टेंबर पासून पत्रकार भवनाच्या इमारतीचे पाडकाम सुरू झाले आहे. यानिमित्ताने ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाच्यामालकीची व कब्जा वहिवाटीची जमिनीच्या वस्तूस्थिती बाबत दि 17 सप्टेंबर रोजी मा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, ठाणे महानगरपालिकेचे  मा महापौर नरेशजी म्हस्के,  मा. आयुक्त , मा सहाय्यक आयुक्त नौपाडा विभाग यांना निवेदन देण्यात आले आहेत.


ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या अथक प्रयत्नाने पंचवीस वर्षांपूर्वी शासकीय जमिन मिळवून गावदेवी मैदान जवळ ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन बांधण्यात आले होते.  ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष ब.के राऊत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर पाटील, सरचिटणीस नारायण पाटील, खजिनदार शाम आटे, उपाध्यक्ष आबासाहेब चासकर, प्रभाकर म्हात्रे, आणि कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार भवनाच्या पायाभरणी पासून मोठ्या मेहनतीने एका विचाराने हे भवन उभारणीचे काम केले.  ठाणे जिल्हा पत्रकार संघाने सुरुवातीला नेमलेल्या विकासकाने फूटींगचे काम केले नंतर काम बंद केले.  काही दिवसांनी विकासक मे राजन शर्मा  यांचेशी करार करून दोन मजल्याच्या पत्रकार भवनची उभारणी करण्यात आली. परंतू पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांना अंधारात ठेऊन राजन शर्मा यांनी अनधिकृत बांधकाम करुन एक इमारत पत्रकार भवनाच्या शेजारी उभी केल्याने आपापसात वाद निर्माण झाले ठाणे जिल्हा पत्रकार संघाने त्या अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेला अर्ज दाखल केले. 


यामुळे विकासक राजन शर्मा यांनी कराराचा भंग करून लबाडीने ठाणे कोर्टात ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या विरोधात दावा दाखल केला की, करारानुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघ मला माझा हिस्सा देत नाही, परंतू विकासकाने त्याच्या हिस्स्याचे बांधकाम व्यावसायिकांना विकून टाकले आणि संघाच्या हिस्स्याचे बांधकाम संघाला हस्तांतरण न करता स्वतःच्या ताब्यात ठेवले. आणि कोर्टातील दावा चालू ठेवला दरम्यान अध्यक्ष ब के राऊत स्मृतीभंशाने आजारी पडले. त्यानंतर 2014 ला प्रभाकर पाटील यांची ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली   ज्यावेळी मा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जमिन शर्तभंगाची नोटीस मिळाली तेव्हा प्रत्यक्ष अध्यक्ष प्रभाकर पाटील, सरचिटणीस नारायण पाटील यांनी संपूर्ण माहिती जाणून  घेऊन काम हातात घेतले आणि पत्रकार संघाची केस चालविण्यासाठी स्वतंत्र वकील नियुक्ती केले.


ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या मालकीची व कब्जे वहिवाटीची जमिनीवरील वास्तूबाबत मा. ठाणे  प्रांताधिकारी साहेबांच्या पुढे वस्तूस्थिती मांडली.मा प्रांताधिकारी साहेबांच्या सुचनेनुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा चेंज रिपोर्ट हवा असल्याने नवीन कार्यकारीणीने मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला असता ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या तत्कालिन अध्यक्षांनी  विरोधात हरकत अर्ज केला. गेली पाच वर्षे ती केस अजूनही मा. सहाय्यक  धर्मादाय आयुक्तांकडे निर्णयासाठी आहे,   ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या तत्कालिन अध्यक्षांनी तद्नंतर ठाणे जिल्हा पत्रकार संघाकडे सभासदत्वासाठी अर्ज केला होता. 


मात्र साधे  सभासद नसताना सध्यस्थितीत ते ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून  कसे काय मिरवतात याचेच आश्चर्य वाटते. त्यामुळे ठाण्यातील पत्रकारांची आणि शासकीय अधिकार्‍यांची दिशाभूल होत असून ठाणे  जिल्हा  पत्रकार संघाच्या   विद्यमान पदाधिकारी यांच्या हक्कावर गदा आणून मा. धर्मादाय आयुक्तांच्या निकालाचा अवमान केला जात आहे.  हे सर्व अडथळे पार करून ठाण्यातील पत्रकारांसाठी  पत्रकार भवनाच्या स्वप्नाला तडा न जाऊ देता पुन्हा नव्याने पत्रकार भवन उभारण्यासाठी जिद्दीने लढा देण्याचे काम जिल्हा अध्यक्ष प्रभाकर पाटील, सरचिटणीस नारायण पाटील, खजिनदार शाम आटे, उपाध्यक्ष आबासाहेब चासकर, प्रभाकर म्हात्रे, बि डी गायकवाड, करीत आहेत.


आबासाहेब चासकर  (९८६७६१६२०६)


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com