गटारांमधील पाण्याच्या नळ जोडण्या ठरत आहेत संसर्गाचे कारण
शहापूर
प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांचे लक्ष नसल्याने शहरातील सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. वासिंद पूर्व, पश्चिम मध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक नळ जोडण्या हया गटारीच्या दूषित मैलमिश्रित पाण्यात असल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे. या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गटारातील पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या वासिंदकरांसाठी ठरू शकतात संसर्गाचे कारण ? तर सध्याच्या कोरोना महामारीत वासिंदकरांना नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.
शहापूर तालुक्यातील वासिंद पूर्व स्टेशन रोड लगत तसेच उत्कर्ष सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मेघनाथ सलून समोर वार्ड क्रमांक ५ मध्ये असलेल्या गटारीत गेल्या अनेक वर्षांपासून वासिंद ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठ्याचा वॉल आहे. या वॉलद्वारे नळ जोडण्यांमधून वासिंद पूर्वेच्या नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो, वार्ड क्रमांक १ मधील शेलार नगर प्रवेशद्वारासमोर असलेल्या गटारीत गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पुरवठ्याचा वॉल आहे. या वॉलद्वारे नळ जोडण्यांमधून वासिंद पश्चिमेच्या शेलार नगर, ज्ञानेश्वर नगर येथील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो अशी परिस्थिती वासिंद मधील अनेक नागरांमध्ये आहे.
गटारांतील मैलमिश्रित पाणी व दूषित पाणी मिक्स होऊन हे दूषित गटार सदृश्य पाणी नळ जोडण्यांमधून या विभागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा केला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या घटनेमुळे वासिंद पूर्वे, पश्चिमचे नागरिक भयभीत झाले असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत आहेत . ग्रामपंचायतकडून वासिंद पूर्वे, पश्चिमच्या पायाभूत सुविधांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, दैनंदिन स्वच्छता, पथदिवे, आरोग्य सेवा या मूलभूत सुवीधांपासून येथील अनेक नागरिक वंचित राहत आहेत. येथील नागरिक वारंवार तक्रारी करत असतात परंतु प्रत्येकवेळी त्यांना फक्त अश्वासनेच दिली जात आहेत. गटारातील दूषित पाणी अनेक वॉलमधून नळाद्वारे पाणी पुरवठा केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ग्रामपंचायत सदस्य व प्रशास्सन याबाबत उदासीन असल्याने या गंभीर बाबीची दखल घेत नसल्याने नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सांगितले येथील सदस्यांना सांगितले पण पाहू करू असे उत्तरे दिली जात असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान वासिंद पूर्वेचे
काम करण्यात आले परंतु बदललेला वॉल सुरक्षित जागी हलविला मात्र पाण्याची पाईप लाईन गटारातच असल्याने त्या पाईपमध्ये गटाराचे मैलमिश्रित दूषित पाणी मिक्स होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे
त्रस्त नागरिकांकडून वासिंद मधील सर्व
गटारांतील वॉल तसेच नळ जोडण्या सुरक्षित जागी हालविण्यात यावा अशी मागणी देखील केली जात आहे.
0 टिप्पण्या